News34 chandrapur
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्यात सातत्याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून या नरभक्षक वाघांना त्वरीत जेरबंद करावे, अन्यथा निलंबनाच्याा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. Tiger attack
Man eater tiger
Man eater tiger
14 डिसेंबर रोजी मुल तालुक्याआतील कांतापेठ येथे देवराव सोपनकार, सावली तालुक्या त बाबुराव कांबळे व 15 डिसेंबर रोजी खेडी येथे स्वरूपा येलट्टीवार यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झाला. त्याआधी 7 डिसेंबर रोजी पेटगांव येथे देखील वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यु झाला. सतत होणारे वाघांचे हल्ले व नागरिकांचे जाणारे बळी ही चिंतेची बाब आहे. Human Wildlife Conflict
या वाघांना तातडीने जेरबंद करण्याची आवश्यकता आहे. याबाबत कोणतीही हयगय खपवून घेणार नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी व सर्व संबंधित अधिका-यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश दिले आहे.