News34 chandrapur
चंद्रपूर - 14 डिसेंम्बरला रात्री चंद्रपुरातील मुख्य बसस्थानक चौकात मद्यधुंद ऑटो चालकाने भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली.
या धडकेत भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी गणेश मानकर हे गंभीर जखमी झाले होते, नागरिकांनी मानकर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मानकर यांना डोक्यावर, हनुवटी व जबड्यावर जबर मार लागला, त्यांना तब्बल 70 टाके लागले. Chandrapur accident
अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी ऑटो चालकाला चोप देत रामनगर पोलीस स्टेशन मध्ये नेले, मात्र पोलिसांनी कारवाई न करता ऑटो क्रमांक MH34D7967 जप्त केला व मद्यधुंद ऑटो चालक मनोहर वायकर याला घरी जाण्यास सांगितले.
याबाबत News34 ने अपघाताची बातमी प्रसारित केली, त्यानंतर पोलीस प्रशासनाने ऑटो चालक वायकर यांच्यावर कलम 338, 279, 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला. Drunken auto driver
गुन्हा का दाखल केला नाही याबाबत निमेश मानकर यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेत जाब विचारला असता त्यानंतर ऑटो चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मद्यधुंद अवस्थेत वायकर हे ऑटो चालवीत होते, प्रशासनाने अश्या ऑटो चालकांवर कारवाई करण्याची मागणी निमेश मानकर यांनी केली आहे, जर या धडकेत जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण असतं? असा प्रश्न ही मानकर यांनी यावेळी उपस्थित केला.