News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील बाबूपेठ जवळील रेल्वे उड्डाणपुलावर पुन्हा एक अपघात घडला. Flyover accident
15 डिसेंम्बरला सकाळी 9 वाजताच्या सुमारास एक युवक दुचाकीने भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले असता पुलाच्या वळणावर दुचाकी स्लिप झाली असता दुचाकीवरील युवक थेट पुलाच्या खाली कोसळला. Babu peth accident
चंद्रपूर-बल्लारपूर जवळील हा रेल्वे उड्डाणपूल आता अपघातप्रवण स्थळ होत चालला आहे, याआधी सुद्धा या पुलावर असे अनेक अपघात घडले होते, एकदा चारचाकी वाहन पुलाच्या रेलिंग ला तोडत खाली पडली होती त्यामध्ये 2 युवकाचा मृत्यू झाला होता. त्यांनतर या पुलावर अपघाताची मालिका सतत सुरू आहे, पुलावरील असलेली रेलिंग 3 ते 4 ठिकाणी तुटलेली आहे.
आजही या पुलावर रेलिंग तुटलेल्या अवस्थेत आहे, संबंधित प्रशासन मोठ्या अपघाताची वाट बघत आहे असा प्रश्न आज अपघातावेळी उपस्थित झाला.
न्यूज छान आहे. Please visit my website https://www.ballarpurvarta.com/
उत्तर द्याहटवा