News34 chandrapur
चंद्रपूर - दारुबंदी काळात तयार झालेल्या दारु विक्रीतील गुन्हेगारांनी दारुबंदी उठल्या नंतर इतर अवैध धंदे सुरु केले आहे. यात कोळसा तस्करी सह ड्रग्स, एम.डी या सारखी अमली पदार्थ मोठ्या प्रमणात विकल्या जात आहे.
Mdp drugs
Mdp drugs
चंद्रपूरात सुरु झालेली ही नव्या गुन्हेगारीची पध्दत व नवे अवैध धंदे चिंतची बाब असुन यावर अंकुश घाला अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून यासाठी रेकोर्ड तपासून उत्तम कारकीर्द असलेल्या अधिकाऱ्यांच्या चंद्रपूरात नियुक्त्या करा असे यावेळी सभागृहात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. Illegal business list
हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावार बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले कि, कायदा व सुव्यवस्थेच्या आधारे राज्याचे मापदंड ठरत असते. ज्या राज्याची कायदा सुव्यवस्था उत्तम ते राज्य चांगल अस मानल्या जात. चंद्रपूरात सहा वर्ष दारु बंदी राहिली. या काळात दारुचे अवैध धंदे करणारे अनेक नविन गुन्हेगार तयार झाले. आम्ही स्वत: दारुने भरलेल्या सात गाड्या पकडून दिल्यात. त्यानंतर प्रकरणाचे गांर्भिय लक्षात घेत चंद्रपूरातील दारु बंदी उठविण्यात आली. मात्र आता दारुबंदीत गुंतलेल्या गुन्हेगारांनी गुन्हेगारीची नवी पध्दत सुरु केली आहे. या गुन्हेगांराकडून आता ड्रग्स, एमडी यासारखे व्यसनाचे विविध प्रकार विकल्या जात आहे. Illegal business in chandrapur
अनेक अवैध धंदे त्यांच्याकडून सुरु करण्यात आले आहे. चंद्रपूरात खनिज संपत्ती आहे. यावरही गुन्हेगांराची नजर असुन अनेक गुंड प्रवृत्तीचे युवक अवैध कोळश्याच्या तस्करीत गुंतले आहे. Mineral wealth
कर्नाटक एम्टा या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी सुरु आहे. वरोरा चा ट्रक माजरी सायडिंग जाण्याएवजी तो उलट 45 किलोमीटर चंद्रपूरला येतो. Karnataka Emta coal mines limited
त्याला पकडल्या नंतर केवळ वाहण चालकावर थातुर मातुर कार्यवाही केल्या जाते. Coal mines in chandrapur
हि संघटीतपणे ठरवून केलेली चोरी आहे. त्यामुळे दारु बंदी नंतरच्या चंद्रपूर जिल्हात वाढलेल्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची गरज. चंद्रपूर औद्योगिक जिल्हा आहे. कायदा सुव्यवस्था उत्तम राहिली तरच येथे नविन उद्योग येतील, त्यामूळे येथे उत्तम कारकीर्द असलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली आहे.
Kishor jorgewar
संपूर्ण विदर्भाच चित्र बदलविण्याची क्षमता असलेल लोहखनिज सुरजागड प्रकल्पात आहे. परंतु हे उद्योग येत असताना त्यांना लागणाऱ्या सोयी सुविधा पुरविण्याची गरज आहे. चंद्रपुरातील एमआयडीसी मध्ये नवीन उद्योजगांना जागा मिळत नाही. Surjagad project company
चंद्रपूर एमआयडीसीच्या २८६ एक्टर जागे मध्ये 480 भुखंड होते. यातील 429 भुखंडाचे वाटप झाले. आणि केवळ 217 उद्योग या ठिकाणी सुरु झाले. येथील 188 भुखंड अजुनही रिकामे आहेत. तर 50 भुखंड विकल्या गेले नाही. ही परिस्थती असतांनाही एकादा नवा उद्योजक येथे उद्योग सुरु करण्यसाठी जागा मागण्याकरिता गेला असता त्यांना भुखंड नाही असे सांगीतल्या जाते. तर दुसरी कडे नागपूर येथील आर्या कंपणीला रस्त्यालगत भुखंड केवळ 15 दिवसात उपलब्ध करुन दिला जातो. ही तफावत दुर केल्या गेली पाहिजे अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली आहे. कोणाचीही मागणी नसतांना गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. येथे कोणत्याही सोयी सुविधा नाही. येथुन मीळविलेल्या डिग्रीला किंमत नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हातील 15 हजार विद्यार्थी मुंबई आणि पुणे, नागपूर या ठिकाणी शिकायला गेलेत. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठातील सोयी सुविधा वाढविण्यात याव्यात. येथे नविन अभ्यासक्रम सुरु करण्यात यावेत अशी मागणी यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली आहे.
