News34 chandrapur
वरोरा - वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत वाढलेली गुन्हेगारी व गुन्हेगारी मध्ये सहभागी असलेले आरोपी यांच्या मुसक्या आवळण्यासाठी वरोरा येथे रंगदारी करणाऱ्या अमोल उर्फ बब्या हिरामण लोखंडे याला तडीपार करण्यात आले आहे. Chandrapur police
अमोल लोखंडे वर वरोरा पोलिसांनी कलम 394, 34, 324, 34, 65 ई, मदाका 188, 341, 326, 394, 143, 147, 148, 149, 427 व 307 अंतर्गत गुन्हे दाखल आहे. Deportation punishment
सदर इसम हा एकोना कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रक ला थांबवित त्यांच्याकडून रंगदारी करीत पैसे वसुली करण्याचे काम करीत होता. Deportation process
अमोल लोखंडे याला वरोरा व चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्याची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. Chandrapur police
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे
