News34 chandrapur (गुरू गुरनुले)
चंद्रपूर - विकासाच्या नावावर कोटी रुपये खर्च करुन मुल नगर वासिय जनतेला २४ तास पिण्याचे पाणी पाजनार असे जनतेला दिलेले नाम. पालकमंत्र्यांचे आश्वासन नगर परिषद पदाधिकाऱ्यांच्या व प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे फोल ठरत असल्याने मुल नगरातील जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची पाळी येत असेल तर कोटी रुपये खर्चाचे काय असा प्रश्न मूलच्या नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी जवळ केला आहे. Water supply schemeनगरातील जनतेला २४ तास पिण्याचे पाणी मिळावे म्हणून पालकमंत्री यांनी शासनाकडून वैनगंगा नदीवर हरणघाट येथे २८ कोटी रुपये खर्चाची योजना मंजूर केली. सतत २४ तास पाणी घेण्यासाठी हरणघाट योजनेवर पावर फुल विद्युत प्रवाहची गरज असल्याने विद्युत पावर घेण्यासाठी बेंबाळ पावर् स्टेशन जवळ पडत असल्याने तिथूनच एक्स्प्रेस फिडरची लाईन घेण्यात आली. परंतु ही लाईन महिन्यातून कधीही मधे मधे बंद पडत असल्याने पाणी पुरवठा योजनेवरील लाईन अनेकदा बंद राहते. त्यामुळे मुल नगरात पाणी पुरवठा २४ तास होत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. एक्स्प्रेस फिडरची सहसा बंद होत नसते, अधिकाधिक एक ते दोन तास बंद खूप झाले चोवीस तास बंद राहू शकत नाही. अशी वस्तुस्थिती आहे. असे एका जाणकारांकडून सांगण्यात आले. पण बेंबाळ वरुन लाईन गेली, तर मात्र दुरस्तीचे काम सुरू आहे असं मॅसेज नेहमीच टाकून नगरातील पाणी पुरवठा होणार नाही अशी सूचना पाणी पुरवठा विभागाकडून केली जाते. जर नेहमीच एक्स्प्रेस फिडर तीन चार कोटी खर्चून खराब होत असेल तर मग फिडरवर कोटी रुपये खर्च करण्यात अर्थ काय, नगर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. एक्स्प्रेस फिडर लाईनचे मेंटनंस का केले जात नाही. याचा नगरातील जनतेचा दोष काय, जनतेकडून नियमानुसार पाणी कर घेतल्या जात आहे.तसे बिल नगर प्रशासनाकडून नळ धारकांना देण्यात आले आहे. जनतेला २४ तास पाणीपुरवठा होत नाही तर २४ तास पाणी पुरवठ्याचे बील कसे काय पाठवतात बिलांमधे कपात का केली जात नाही. असाही प्रश्न अनेक नागरिकांनी केला आहे. एकंदरीत २४ तास पिण्याचे पाणी देणार अशी घोषणा पालक मंत्र्याची फोल ठरत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले आहे.