News34 chandrapur
माजरी - चंद्रपुरातील उच्च पदस्थ अधिकारी हनिट्रप चा प्रकार उघडकीस आल्यावर आता एका मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांवर एट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
Atrocities act
Atrocities act
माजरी वेकोली मध्ये कार्यरत फिर्यादी 53 वर्षीय किशोरीकांत चौधरी यांनी थेट माजरी वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक व्ही.के. गुप्ता यांच्यावर एट्रोसिटी चा गुन्हा दाखल केला. Wcl chandrapur
वेकोलीच्या फिल्टर प्लांट वर कार्यरत किशोरीकांत चौधरी यांच्या हाताने स्पर्श झालेलं पाणी कोण पिणार? तुम्ही प्लांट वर काम करू शकणार नाही असे गुप्ता यांनी म्हणत चौधरी यांची बदली 17 नोव्हेंम्बरला माजरी ओसीएमक्यू मध्ये केली. त्यानंतर चौधरी हे कर्तव्यावर रुजू झाले मात्र 24 नोव्हेंम्बरला चौधरी यांची बदली थेट मध्यप्रदेश मधील पाथरखेडा येथे करण्यात आली. Chandrapur news
चौधरी यांना मुख्य महाप्रबंधक गुप्ता यांनी नाहक त्रास देत जातीवाचक भाषेत बोलण्याने त्यांच्यावर एट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला.
वेकोलीच्या मुख्य महाप्रबंधक वर वेकोलीच्या कर्मचाऱ्याने एट्रोसिटी चा गुन्हा दाखल केल्याने माजरी वेकोली मध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.