News34 chandrapur
चंद्रपूर:- मागील काही दिवसापासून रामाळा तलावाच्या परिसरात दुर्गंधी पसरल्याने परिसरात राहणाऱ्या व त्या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने आज युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी आयुक्तांची भेट घेत रामाळा तलाव परिसरातील समस्याचे निवेदन देण्यात आले. Yuvasena chandrapur
चंद्रपूर शहरातील रामाला तलावाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त असून या तलावाच्या खोलीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता मात्र आता पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. Ramala lake chandrapur
परिसरातील समस्या तात्काळ दूर न झाल्यास महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दिले. यावेळी युवसेनेचे जिल्हा समन्वयक विनय धोबे विधानसभा समन्वयक लोकेश कोटरंगे, युवासेना शहरप्रमुख शहबाज शेख शिवा वजनकर सह युवासैनिक उपस्थित होते.