News34 chandrapur
चंद्रपूर - महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होताना दिसून येत आहे, सदर घटनांना आळा कशाप्रकारे घालता येणार यावर एकच उपाय आहे, जनजागृती छेडखानी, लैंगिक छळ, टॉउंट, रॅगिंग, चुकीचा स्पर्श यावर चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयात पोलीस काका पोलिस दीदी असा उपक्रम सुरू केला आहे.
मुलींना सध्या छेडखानी व लैंगीक अत्याचाराला बळी पडत आहे, मात्र याची सुरुवात नेमकी कशी होते यावर चंद्रपूर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मुला-मुलींना मार्गदर्शन करीत आहे.
चुकीचा स्पर्श काय? Good touch bad touch म्हणजे काय यावरही योग्य मार्गदर्शन चंद्रपूर पोलीस दलाच्या वतीने सुरू आहे. Molested
विद्यार्थ्यांनी अश्या अत्याचाराला बळी न पडता हिंमत करीत पोलिसांशी सम्पर्क साधण्याचे आवाहन करीत आता पोलीस विद्यार्थी मित्र ची नवी संकल्पना या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. Chandrapur police
112 क्रमांकाचा वापर काय? महिला व मुलींबाबत कायद्याची रूपरेषा या मार्गदर्शन शिबिरात समजवून सांगण्यात येत आहे.
पोलीस-काका पोलीस दीदी उपक्रम काय आहे याबाबत नागरिकांनी सुद्धा आपल्या पाल्याना द्यावी असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयात नियमितपणे राबविणार असल्याची माहिती चंद्रपूर पोलीस दलातर्फे देण्यात आली आहे.
पोलीस-काका पोलीस-दीदी या उपक्रमाचे समनव्यक अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक लता वाढीवे काम बघत आहे.