News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मागील वर्षी पार पडलेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजीत वंजारी यांना भरघोस मतांनी निवडून आणले. Congress party
मुल तालुक्यातील प्रचाराची धुरा काँग्रेस नेते,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात तालुका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम व मेहनत घेतली असून विजयश्री खेचून आणण्यात कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यानिमित्त विधिमंडळ अधिवेशन दिनाचे औचित्य साधून त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन आमदार अभिजित वंजारी यांचे अभिनंदन केले. Congress news आणि मुल तालुका काँग्रेस च्या वतीने तालुका काँग्रेस कार्यालयातील अंतर्गत किरकोळ सोई सुविधा आपल्या स्तरावरून जे शक्य होईल ते करुन द्यावे. तसेच मॅi.दुर्गा मंदिर समितीच्या कार्याला काही आर्थिक मदत करावी अशा विनंतीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी जी.प. अध्यक्ष व दुर्गा माता मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, यांचे नेतृत्वात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदीप गड्डमवार संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष, तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार , विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक राजेंद्र कन्नमवार, माजी नगर सेवक तथा नवनियुक्त तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, दुर्गा मंदिर समितीचे सचिव संजय पडोळे, सरपंच राहुल मुरकुटे, इत्यादींच्या उपस्थितीत आमदार महोदयांना निवेदन देण्यात आले.
