News34 chandrapur
चंद्रपूर/मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे, मागील वर्षभरापासून अनिल देशमुख तुरुंगात आहे.
मात्र देशमुख यांच्या बाजूने लागलेल्या निकालावर सीबीआय ने आक्षेप घेत निर्णयावर न्यायालयाने स्थगिती द्यावी असा अर्ज दाखल केला, विशेष म्हणजे न्यायालयाने सुद्धा सीबीआय ची बाजू ऐकत देशमुखांच्या जामीनावर 10 दिवसांची स्थगिती दिली आहे. Anil deshmukh granted bail
तुरुंगातून बाहेर येण्यासाठी देशमुख यांना अजून 10 दिवस वाट बघावी लागणार आहे, जामीन मिळाल्यावर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. जामीन दिल्यावर न्यायालयाने काही अटी ठेवल्या आहे, अनिल देशमुख यांना आपला पासपोर्ट तपास यंत्रणेकडे जमा करावा लागेल, आठवड्यातून 2 दिवस ED कार्यालयात हजर व्हावे लागेल.