News34 chandrapur
चंद्रपूर/दिल्ली - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) 2023 च्या परीक्षेचे वेळापत्रक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, मात्र ते वेळापत्रक बनावट असल्याचं सेंट्रल बोर्डाने स्पष्ट केले आहे.cbse fake news
ऑनलाइन युगात आज अनेकजण खोट्या माहिती पसरविण्याचे काम करीत आहे, खोटी माहिती पसरवायला काही मिनिटे लागतात मात्र त्याचा परिणाम वाईट होतो. CBSE education news
आता तर परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा बनावट येत आहे, जोपर्यंत CBSE.gov.in च्या संकेतस्थळ वर अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत कसल्याही बनावट वेळापत्रकावर पालक व विद्यार्थी वर्गाने विश्वास ठेवू नये असे आवाहन cbse व्यवस्थापकांनी केले आहे. CBSE board exam 2023
CBSE ने नुकतीच 10वी आणि 12वी च्या प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसईच्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 जानेवारीपासून होणार आहेत. दुसरीकडे, 15 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, याचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच अधिकृत वेबसाइटवर तपासा. असं आवाहन सीबीएसई कडून करण्यात आलं आहे.