News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - पहिलेच शेतकरी कर्जबाजारी असून आर्थिक अडचणीचा सामना करण्याची शक्ती शेतकऱ्यांत राहिलेली नाही. अशा अवस्थेत शेतकरी जगत असताना यावर्षी पेरणीच्या वेळेस अती पाऊस आल्याने पेरण्या वाहून गेल्या,
शेतातच रोपे सडून गेले त्यामुळे धानाचे पीक दरवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या हाती कमी आले. असे असताना मूलच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकांशी कुठलीही चर्चा न करता आपल्या मर्जीने भाव ठरवून कमी भावात शेतकऱ्यांचे धान खरेदी करीत आहेत. करीता शेतकरी हताश, निराशावादी झाला असून खर्चापेक्षा उत्पन्न कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यासाठी काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे शेतकऱ्यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकांना निवेदन देण्यात आले.सचिव अजय घंटावार यांनी निवेदन स्वीकारले. व निवेदन शासनापर्यंत तात्काळ पाठविले जाईल असे आश्वासन दिले. बाजार समितीमध्ये २४५० पर्यंत भाव असल्याचेही सांगितले. निवेदनाची मुख्य प्रत तहसीलदार मान. डॉ.रवींद्र होळी यांनाही देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांना आपल्या स्तरावरून योग्य न्याय मिळऊन द्यावे.
अशी मागणी केली असता स्थानिक व्यापाऱ्यांची तातडीची बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बोलाऊन चर्चा करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्र्वासित केले. तसेच कर्ज माफी मधील नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान शासन रोखून धरले त्याचीही मागणी, पेरणीच्या नुकसान भरपाईची मागणी,विम्याची मागणी अशा अन्य मागण्या निवेदनात केल्या असल्याची चर्चा तहसीलदार होळी यांचेशी केली असता शासनाकडे आपल्या निवेदनाचा लगेच पाठपुरावा करणार असे सांगून व्यापाऱ्यांची बैठक त्वरित बोलवावे असे नायब तहसीलदार श्री. पवार यांना निवेदन कर्त्यांसमोर आदेश दिले. निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती व माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर, माजी सभापती व संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष राकेश रत्नावार, तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संदीप कारमवार, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक राजेंद्र कन्नमवार, किशोर घडसे, डॉ.पद्माकर लेंनगुरे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी प्राचार्य बंडूभाऊ गुरनुले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेड्डीवार, आदर्श खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भूरसे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार ,अन्वर शेख, शेतकरी प्रभाकर सोनुले, नरेंद्र वाढई, यांचेसह अनेक ग्रामीण काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.