News34 chandrapur
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यात करोडपती गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या साखरी गावाला घरघर लागली असून अख्ख गाव व्यसनाच्या आहारी गेल्याने येथील महिलांना घरच्यांचा विरोध झुगारून सामाजिक कार्यकर्ता अंकुश गोरे यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून राजुरा पोलीस स्टेशन येथे धडक देत गावात सुरू असलेल्या अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाही करण्याची मागणी केली असता प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष दरेकर यांनी लागलीच (दि. १५) पोलीस कर्मचारी साखरी गावात पाठवून अवैद्य दारू विक्रेते व त्यांच्याजवळील दारू सायंकाळी जप्त केली आहे.
Illegal liquor sale
करोडपती गाव म्हणून ख्याती असलेले साखरी गाव सध्या अवैद्य धंद्याचे माहेरघर बनले आहे. याठिकाणी कोळसा चोरी, डिझेल चोरी, भंगार चोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून गावातच खुले आम बिअर बार सारखे टेबल लावून अवैद्य दारूची विक्री मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या ठिकाणी काही नागरिक आपल्या लहान मुलांना सुद्धा दारू आणण्यासाठी पाठवीत आहे, यामुळे नवीन पिढी सुद्धा पूर्णपणे व्यसनाच्या आहारी जात असल्याने येथील बचत गटाच्या महिलांनी व इतर महिलांनी सामाजिक कार्यकर्ते अंकुश गोरे यांना सांगून त्यांच्या नेतृत्वात गावात दारू बंदी करण्यासाठी गावाच्या सरपंच व उपसरपंच यांना महिलांनी बोलाविले मात्र या विषयाकडे त्यांनी पाठ फिरविली त्यानंतर ग्राम सभेत दारू बंदीचा ठराव मांडला असता काही आंबट शौकिनांनी याला सुद्धा विरोध दर्शविला आहे.
Chandrapur police
गावात सुरू असलेल्या अवैद्य दारू विक्रेत्यांना याअगोदरच अवैद्य दारू विक्री न करण्याच्या सूचना महिलांनी व अंकुश गोरे यांनी त्यांच्या घरी जाऊन दिल्या होत्या तरी दारू विक्रेते येथील काही आंबट शौकीनांच्या भरोशावर दारू विक्री करू लागले. अवैद्य दारू विक्री करतांना महिलांनी त्यांना विरोध केला त्यावेळेस त्यांनी महिला व अंकुश गोरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली यावरून दारू विक्रेत्यांची मुजोरी किती वाढली हे दिसून येत आहे. भर दिवसा खुलेआम दारू विक्री होत असताना गावातील सरपंचाने याविरोधात आवाज उठविणे आवश्यक आहे, मात्र असे दिसून येत नाही तेव्हा नागरिकांनी अपेक्षा तरी कोणाकडून करायच्या असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.
गावातील तीस ते चाळीस महिला व युवक अवैद्य दारू विक्रेत्याच्या विरोधात राजुरा पोलीस स्टेशन येथे धडकले तेव्हा प्रभारी ठाणेदार संतोष दरेकर यांनी लगेच ऑक्शन घेऊन साखरी येथे पोलीस कर्मचारी पाठवून अवैद्य दारू विक्रेते विशाल वांढरे व धनराज जयपूर यांना सायंकाळी आठ वाजता मुद्देमलासह ताब्यात घेतले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंकुश गोरे, बबन उरकुडे, पोलीस पाटील उरकुडे, गावातील बचत गटाच्या महिला व इतर महिला युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.