News34 chandrapur
चंद्रपूर - सध्या शिक्षणासोबत आजचे विद्यार्थी खेळात नाव लौकिक करीत असून चंद्रपुरातील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित पॅरामाउंट कॉन्व्हेंट हायस्कूल मधील विद्यार्थी अर्णव सचिन गेडाम यांची राज्यस्तरीय कॅरॅम स्पर्धेत निवड करण्यात आलेली आहे. Student success
आधी जिल्हा त्यानंतर विभागीय स्तरावर कॅरॅम स्पर्धेत अजिंक्य राहत अर्णव ने विजयी कामगिरी केली, शालेय व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धा गडचिरोली येथे विभागीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत अर्णव ने कॅरॅम स्पर्धेत केलेल्या अजिंक्य कामगिरीमुळे त्याची निवड थेट राज्यस्तरीय स्पर्धेत निवड करण्यात आली. Paramount convent chandrapur
अर्णव ने शारीरिक शिक्षक सुरेश झुंगरे यांच्या मार्गदर्शनात सदर कामगिरी बजावत हायस्कूल चे नाव प्रकाश झोतात आणले.
शाळेचे संस्था अध्यक्ष पांडुरंग आंबटकर व प्राचार्य फैयाज अहमद यांनी अर्णव चे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. Carrom Competition