News34 chandrapur
चंद्रपूर - दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस विभागातर्फे भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवकांसाठी अनेक वर्षानंतर रोजगाराची मोठी संधी आलेली आहे.
त्यामुळे केवळ चंद्रपूर शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी चंद्रपूरला मुक्कामी राहून पोलीस भरतीसाठी शारीरिक सराव करीत आहेत. तसेच लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करीत आहेत. यावेळी पोलीस भर्तीमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार असून या चाचणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा दिल्यानंतर त्यांची निवड करण्यात येईल. अशातच पोलीस भर्तीची तारीख काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना दिनांक 9 डिसेंबर पासून सराव करणाऱ्या युवकांकरिता चंद्रपूरचे जिल्हा क्रीडा संकुल बंद करण्यात आले.

Police recruitment
जिल्हा क्रीडा संकुलात विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा असल्यामुळे 22 डिसेंबर पर्यंत क्रीडा संकुल बंद करण्याचा नोटीस लावण्यात आला.सरावा करिता शहरात इतर कोणतेही क्रीडांगण उपलब्ध नसल्यामुळे शेकडो युवकांना मागील एक आठवड्यापासून शहरातील महामार्गावर सकाळ- संध्याकाळ सराव करावा लागत आहे .शारीरिक दृष्ट्या व सुरक्षेच्या कारणाने रस्त्यावर सराव करणे योग्य नसल्यामुळे भर्ती प्रक्रियेत भाग घेण्यास इच्छुक युवकांना एक आठवड्यापासून अडचणीचा सामना करावा लागत आहे. या सर्व युवकांनी जिल्हा क्रीडा संकुलात एकत्र होऊन जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्याशी प्रत्यक्ष भेटून आपली व्यथा मांडली. District stadium chandrapur
यानंतर देशमुख यांनी जनविकास युवा आघाडीचे अक्षय येरगुडे,अमर रामटेके यांचेसह महेश वाढई,सुशील पेंदोर मुकेश, मंगेश मडावी,नरेंद्र नौकरकर ,मनोज कुंभारे, वैष्णवी कोठारकर ,अस्मिता अडकिने, नम्रता काळे प्रतीक्षा दुर्गे इत्यादींचा समावेश असलेले एक शिष्टमंडळ घेऊन आज दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली व पोलिस भर्ती प्रक्रियेत भाग घेणाऱ्या युवकांच्या समस्येबाबत लेखी निवेदन दिले. यानंतर जिल्हाधिकारी गौडा यांनी तातडीने जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना फोनवरून क्रीडा संकुल पोलीस भर्तीचा सराव करणाऱ्या युवकांसाठी खुले करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे रविवार 18 डिसेंबर पासून पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता जिल्हा क्रीडा संकुल खुले करण्यात येणार आहे. यामुळे शेकडो युवकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आभार मानले.