News34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकार व शिंदे सरकारच्या पुढाकाराने संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 70 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 55 हजार रोजगारांची निर्मिती होणार होणार आहे. विशेष म्हणजे यातील सुमारे 40 हजार कोटींचे प्रकल्प विधान परिषदेचे आमदार डॉक्टर रामदास आंबटकर यांच्या मतदारसंघात मंजूर झाल्याने त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहे.

नव्या सरकारच्या या नव्या धाडसी निर्णयामुळे विदर्भातील गडचिरोली व चंद्रपूर सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये तीन मोठे प्रकल्प उभारण्याकरिता मंत्रिमंडळ समितीने नुकतीच मान्यता दिली. यात 20 हजार कोटींची गुंतवणुकीचा हरित तंत्र तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प तसेच स्कूल गॅसिफिकेशन प्रकल्प व लाईट्स स्टील प्रकल्प असे महत्त्वपूर्ण प्रकल्प या नक्षलग्रस्त भागात मंजूर केल्याने या भागातील नागरिकांना एक नव्या दिशेने जीवनाची वाटचाल करण्याकरिता एक मेहनतीचा व स्वाभिमानाचा मार्ग मिळेल असे विधानपरिषद आमदार डॉ रामदास आंबटकर म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी नवीनतम औद्योगिक प्रकल्प स्थापित करून संपूर्ण महाराष्ट्रातील युवाशक्तीला एक नवे उत्साह व स्फूर्ती दर्शन या प्रकल्पांच्या निर्णयातून झालेले आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच एक नवी आनंदाची लहर पसरलेली आहे त्यामुळे नक्कीच येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्र हा देशाचा औद्योगिक हब तयार होईल यात शंका नाही असे विधान परिषद आमदार डॉक्टर रामदास आंबेडकर म्हणाले.