News34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यात सध्या कोळशाचा अवैध व्यापार सुरू आहे, अनेक ठिकाणी कोळशाची तस्करी सुरू आहे, अशीच एक गोपनीय माहिती गडचांदूर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे कोळशाचा अवैध साठ्यावर धाड मारीत कारवाई केली.
Coal smuggling
धानोरा- गडचांदुर मार्गावर भोयगाव नजदीक अवैध कोळशाच्या साठ्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी स्वतः धाड टाकीत लाखोंचा कोळसा जप्त केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कंपनी ला जाणारा कोळशा ची अवैध वाहतूक या मार्गाने होते. छुप्या पद्धतीनें ट्रक चालक आणि कोळसा व्यापारी यांच्या संगनमताने ट्रक मधला कोळसा या ठिकाणी जमा करून खुल्या मार्केट मध्ये विकला जातो.
Chandrapur police सदरची माहिती प्राप्त होताच स्वतः एस् डी पि ओ सुशील कुमार नायक यांनी धाड घालत अवैध चोरीच्या कोळसा व्यापाराच्या मुसक्या आवळल्या आहे. जिल्ह्यात अनेक मोठे कोळशाचे व्यापारी ही या अवैध धंद्यामध्ये मध्ये असल्याचे बोलल्या जात आहे.

नायक यांच्या कारवाईमुळे अवैध कोळसा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.