News34 chandrapur
चंद्रपूर - वर्ष 2012 ला महाराष्ट्र राज्यात सुगंधित तंबाखूवर प्रतिबंध करण्यात आला, तंबाखू व गुटख्यावर प्रतिबंध केल्यावर सुद्धा आजही दोन्ही जीवघेण्या वस्तू सहज उपलब्ध होतात.
जिल्ह्यात आतापर्यंत 2 अवैध सुगंधित तंबाखूच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड मारली मात्र त्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात या वस्तू मिळत आहे.
चंद्रपूर, बल्लारपूर हे दोन मुख्य ठिकाण आहे जिथे छुप्या पद्धतीने भेसळ युक्त सुगंधित तंबाखू तयार होतो.
त्यानंतर नेमलेला व्यक्ती लहान दुकानदारांना हा माल पोहचवीत असतो, चंद्रपुरातील MIDC, बागला चौक, अष्टभुजा, बल्लारपूर टेकडी परिसरात, गंजवार्ड, बाबूपेठ, रयतवारी कॉलरी मध्ये आजही सुगंधित तंबाखू व गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
विशेष म्हणजे आता तस्करांनी किराणा दुकान थाटत त्या माध्यमातून सुगंधित तंबाखू विक्री सुरू केली आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा आधार घेत मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या वस्तू विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू करण्यात आला आहे.
पण या तस्करांना पाठबळ कुणाचं आहे हा आजही एक प्रश्नच आहे, जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभाग असून सुद्धा त्यांच्या समोर या वस्तू दिवसा ढवळ्या उपलब्ध होतात पण कारवाई फक्त नाममात्र होते.
पोलीस विभागातील स्थानिक गुन्हे शाखा गुन्हेगारांना काही तासात पकडते मात्र ही तस्करी त्यांच्या नजरेस का पडत नाही?
ही तर झाली तस्करांची कहाणी आता नजर टाकूया सुगंधित तंबाखू चा खर्रा च्या दुष्परिणामांची.
अनेक युवकांना कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासले असून काहींचा मृत्यू तर काहींचे जबडे काढण्यात आले आहे.
आधी समाजासमोर युवक रस्त्यावर खर्रा खाऊन राजे सारखे थुंकत होते आज तेच युवक कॅन्सर झाला म्हणून लोकांपुढे यायला घाबरत आहे.
पीडित युवक म्हणतात आम्ही या जीवघेण्या वस्तूंचे सेवन केले आणि आमचे आयुष्य उध्वस्त झाले, तुम्ही स्वतःच आयुष्य उध्वस्त करू नका, प्रशासनाने तात्काळ या वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी विनंती केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखू तस्करी व विक्री मध्ये काही राजकीय लोकांचा हात असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
खर्र्यात वापरण्यात येणारी सुपारी यावर अनेक प्रक्रिया केली जाते, काही दिवसांपूर्वी याबाबत महत्वाचा खुलासा पोलिसांनी केला होता, डम्पिंग यार्ड मध्ये फेकलेली सुपारी ट्रक मध्ये भरून यावर अनेक प्रक्रिया करीत त्याला पुन्हा नव्याने बाजारात विक्री साठी आणतात आणि तीच सडकी सुपारी खर्र्याच्या माध्यमातून तरुण सेवन करीत असतात.