News34 chandrapur
गोंडपीपरी - सुरजागड लोहखनिज प्रकल्पातील अवजड वाहतुकीमुळे अनेक अपघात घडले असून यामध्ये अनेकांचा जीव गेला होता, याविरोधात प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्या अन्यथा आंदोलन उभारू असा इशारा वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी प्रशासनाला दिला होता. Vanchit bahujan aghadi
मात्र दिलेल्या वेळेत प्रशासनाने याबाबत काही उपाययोजना न केल्याने रविवार 4 डिसेंबर ला वंचित बहुजन आघाडीतर्फे चक्काजाम आंदोलन होणार आहे. Chakkajam aandolan
आंदोलनातील प्रमुख मागण्यामध्ये अवजड वाहतूकीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले त्याची तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अवजड वाहतूक गोंडपीपरी येथून सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंद करावी. Surjagad iron ore project
ओव्हरलोडिंग वाहतूक बंद करावी, गोंडपीपरी शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे व वेग नियंत्रक बसविण्यात यावे. Overload traffic
वाहनचालकांची मद्य चाचणी करण्यात यावी.
पोलीस तपासणी नाका सुरू करण्यात यावा अश्या विविध मागण्यांसाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार अशी माहिती जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी दिली आहे.