News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल तालुक्यातील अनेक गावे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने वाघांचा हैदोस प्रमाणपेक्षा जास्ती वाढला असून एक वर्षाच्या काळात १७ शेतकरी व गुराख्यांचा गेला आहे.
Tadoba tiger national park
Tadoba tiger national park
जस जशी वाघाची संख्या वाढत आहे. तसी मानवाची संख्या कमी होत जात आहे. वारंवार वाघांचे मानवावर हल्ले होत आहेत तरीही राज्याचे वनमंत्री जिल्ह्याचे असूनही येथील चंद्रपूर मुल येथील वनअधिकारी यांना जाग येत नाही, ही अतिशय खेदाची बाब आहे. जंगलाला लागून शेकडो शेतकऱ्यांची शेती आहे. आणि शेतकऱ्याला शेतीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. वाघाने ठार केल्याच्या अनेक घटना शेकऱ्यांच्याच झाल्या आहेत. मानव असुरक्षित झाला आहे.
हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त वनविभागाने केला नाही तर जनतेच्या हितासाठी आम्ही कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवय राहणार नाही असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनामध्ये दिला आहे. निवेदनामध्ये काही मागण्या केल्या असून १) वाघाच्या बंदोबस्तासाठी वणाच्या सभोवताल संरक्षण भिंत किंवा तारेच्या जाळीचे कुंपण उभारावे. २) वनाच्या सभोवती सौर दिवे लावावे ३) वणाला लागून असलेल्या गावात वनविभागाने गस्त चौकी उभारावी ४) वाघाने ठार केलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना मृत झाल्याच्या दिवशीच तात्काळ १० लाख रुपयाची रोख मदत करावी ५) वाघाने ठार केलेल्या कुटुंबियातील एका व्यक्तीला त्वरित वनविभागात नोकरी द्यावी. ६) शेकऱ्यानची गुरे, ढोरे,बैल गाई म्हशी चरण्यासाठी वनविभागाने आरक्षित जागा उपलब्ध करून देण्यात यावे. अशा मागण्या केल्या असून मागण्यांची अमलबजावनी त्वरित करावी व आम्हाला याबाबत लेखी कळवावे अन्यथा कायदा हातात घेऊन जनतेच्या हितार्थ आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा निवेदनामध्ये दिला आहे. Tiger attack in chandrapur
वाघांच्या हल्ल्यांमुळे हजारो हेक्टर शेतातील खरीप पिके पडीत राहीले तर आता वाघांचे हल्ले वाढल्यामुळे या भागातील रब्बी पीके शेतकऱ्यांना वाघाच्या दहशतीने घेण्यास भिती वाटत आहे, अशी भयावह परिस्थिती आहे. वाघांची संख्या वाढूनही वेळीच योग्य पाऊल न उचलल्यामुळे आता नागरिकांचे जीव धोकयात आले आहेत. सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने वाघांचा बंदोबस्त करावा अशा मागण्यांचे निवेदन काँग्रेस नेते सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या मार्गदर्शनात संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष युवा नेते राकेश रत्नावार,कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष घनश्याम येनुरकर, काँग्रेस कमिटी अध्यक्ष गुरु गुरनुले, काँग्रेसचे राज्य ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, शहर अध्यक्ष सुनील शेरकि, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, ग्रामीण काँग्रेस नेते दीपक वाढई,प्रशांत उराडे, सुरेश फुलझेले, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, माजी संचालक शांताराम कामडे,आदर्श खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुर्से, सरपंच रवींद्र कामडी, विलास दवणपल्लीवार, विक्रम गुरनुले,कैलाश चलाख, जी.के.जीवने, गणेश कोडापे, देवानंद मशाखेत्री, गणेश रणदिवे, रत्नाकर अलोने, आकुलवार आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.