News34 chandrapur (प्रशांत गेडाम)
ब्रह्मपुरी - तालुक्यात आज दारूचा धुमाकूळ बघायला मिळाला, बेधुंद अवस्थेत असलेल्या वाहनचालकांनी रस्त्यावर अपघाताची मालिका चालवली. Accident
उदापुर गावाजवळ असलेल्या राईस मिल परिसरात मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयातून रुग्ण घेऊन परत मुडझा येथे जात होते.
मात्र रुग्णवाहिकेचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने पारडगाव जवळील पेट्रोल जवळ उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. Chandrapur accident
या अपघातात 3 रुग्ण जखमी झाले आहे, आरोग्य केंद्रात असणारे वाहनचालक दारूच्या नशेत रुग्णांचे जीव धोक्यात टाकत आहे, अश्या बेधुंद वाहनचालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
दुसरा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील किनही जवळ रस्ता ओलांडत असताना इसमाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुसाट दुचाकी चालकाने जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकी चालक हा किरकोळ जखमी झाला असून रस्ता ओलांडत असलेला इसम गंभीर जखमी झाला आहे.