News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - दि.०६/१२/२०२२ रोजी सकाळी ५:३० वा दरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली की काही इसम निळया रंगाच्या पिकअप मध्ये अवैधरित्या जनावरे कोंबून मुलकडून चंद्रपूर कडे जाणार आहे.
Animal trafficking
Animal trafficking
या माहीतीवरून तपास पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी पंचासमक्ष उपजिल्हा रुग्णालय मुल टी पॉईंटवर नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहीती प्रमाणे समोरून एक चारचाकी वाहन येताना दिसले. Chandrapur crime news
सदर चारचाकी वाहनास पोलीसांनी हात देवून थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने ते वाहन थांबविले असता ते वाहन माहीती मिळाल्याप्रमाणे निळया रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा पिकअप क्र. MH-33-T-3255 होता. पो स्टॉप व पंचानी आपआपली ओळख देवून पिकअपचे चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव इमरान इक्बाल शेख वय-२६ वर्ष, रा. वार्ड क्र १३, मुल तसेच चालकाचे बाजुचे सिटवर बसलेल्या इसमाने त्याचे नाव अरबाज खान वहीद खान पठाण वय २२ वर्ष, रा. वार्ड क्र ११, मुल असे सांगीतले. सदर पिकअपची पंचा समक्ष पाहणी केली असता अशोक लेलँड कंपनीचा पिकअप क्र. MH-33-T-3255 मध्ये ०८ नग गायी व ०१ बैल असे एकुण ०९ गोवंशीय जनावरे किंमत ७२,०००/- रू. तसेच पिकअप किंमत ५,००,०००/-रू, व दोन्ही आरोपींचे ताब्यातुन दोन अॅन्ड्राईड मोबाईल कि. १४,०००/-रू असा एकूण ०५,८४,०००/- रू चा मुददेमाल मिळून आल्याने पंचनामा कारवाई करून जप्त केला. पिकअप मधिल एकुण ०९ गोवंशीय जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने श्रीकृष्णा गोशाळा व सेवा संस्था, तोहेगांव ता गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जून इंगळे, पो.नि. सतीशसिंह राजपूत यांचे मार्गदर्शनात पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकते, पोअं शफिक शेख, संजय जुगनाके, श्रावण कुत्तरमारे यांनी केली. सदर आरोपी विरूद्ध पो.स्टे. मुल येथे कलम कलम ५, ५(अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, सह कलम ११(१) (ड) प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.