News34 chandrapur
चंद्रपूर - वर्ष 2017 मध्ये राज्यात भाजप-सेनेच्या सरकारमधील तत्कालीन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष आदेश देत कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात CSR योजना सुरू केली.
या योजनेत कोराडी वीज केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना योजनेद्वारे दरवर्षी 5 गुण देण्यात येते. CSR SCHEME
जेणेकरून महाजेनको द्वारे तंत्रज्ञ 3 च्या पदभरतीत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा लाभ मिळतो.
मात्र ही योजना फक्त कोराडी वीज केंद्र पुरती मर्यादित आहे, राज्यात अनेक ठिकाणी औष्णिक वीज केंद्र आहे मात्र त्या ठिकाणी सदर योजनेचा लाभ प्रशिक्षणार्थी यांना मिळत नाही.
बावनकुळे यांचा हा आदेश इतर विद्युत केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी वर अन्याय करणारा आहे. Koradi Thermal Power Station
याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील ITI प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी व गोंडवाना विद्यापीठातील सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी पत्रकार परिषद घेत सदर अन्यायकारक निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
वर्ष 2019 मध्ये महाजेनको मध्ये तंत्रज्ञ 3 च्या पदभरतीत कोराडी मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या अनेकांना CSR योजनेतून मिळालेल्या गुणांचा लाभ झाला, मात्र इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना 75 पैकी गुण मिळवावे लागले होते.
कोराडी मधील CSR योजनेत वर्ष 2017 ते 2022 या कालावधीत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी यांची पहिली बॅच निघाली असून पुढे निघणाऱ्या पदभरतीत त्यांना तब्बल 25 गुणांचा लाभ होणार आहे.
हा अन्यायकारक निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी बेलखेडे यांनी केली असून याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील जनप्रतिनिधी यांची भेट घेत त्यांना याबाबत निवेदने देण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.