News34chandrapur
चंद्रपूर - 5 डिसेंबर सायंकाळी 6 वाजता दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आगरझरी ते अडेगाव मार्गावर चंद्रपूर ते देवाडा जाणारी बस क्रमांक MH34 N 8916 ऑइल लिक झाल्यामुळे बंद पडली होती. Chandrapur police
त्या बस मध्ये शाळेचे तब्बल 40 ते 50 शाळकरी मुले होती, सायंकाळची वेळ असल्याने थंडीचा प्रवाह वाढत होता, कुणीही त्या मुलांची मदत करायला येत नव्हते.
काही वेळानंतर अडेगाव येथील मतदान केंद्रावर भेट देत परत येणारे दुर्गापुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे परत येत होते, वाटेत बस बंद अवस्थेत आणि बाजूला थंडीत कुडकुडनारे लहान मुले, धुळे यांनी तात्काळ वाहन चालकाची विचारपूर केली, त्यानंतर ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी तात्काळ मार्गावरून जाणारे वाहन थांबविले व स्वतःचा वाहनात मुलांना बसवीत त्यांना त्यांच्या स्वगावी सुरक्षित पोहचविले. Swapnil dhule
खाकी च्या या माणुसकीने लहान मुले सुद्धा भारवली, पोलिसांच्या सदरक्षणाय खलनिग्रहनाय या ब्रीद वाक्याचा नेमका अर्थ काय हा त्या चिमुकल्यांना ही कळला.
आपल्या घरी जाता जाता त्यांनी पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचे मनापासून आभार मानले.
पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचं कर्तव्य व माणुसकीमुळे ते सर्व विद्यार्थी घरी सुरक्षित पोहचू शकले, धुळे यांच्या या कर्तव्याची जिल्हाभर चर्चा सुरू होती.
