News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - युवाशक्ती व्यायाम मंडळ मुल अंतर्गत मंडळाचे अध्यक्ष व सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात १४ ते १७ वयोगटातील मुला मुलींची कुस्ती स्पर्धेसाठी निवड करुन जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाठविण्यात आले. त्यात जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय प्राप्त करुन त्यांची विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेकरीता निवड झाली असल्याने. निवड झालेल्या चमुचे युवाशक्ती व्यायाम मंडळ तर्फे मूलच्या भव्य पटांगणावर विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
Wresling
Wresling
१४ वर्ष पर्यंतच्या गटात निर्भय पीपरे द्वितीय,हर्ष मांदडे प्रथम,श्रीकांत केलझरकर द्वितीय,कृष्णा शेंडे प्रथम,मोहित चौखुंडे प्रथम, मुलींमध्ये प्रथम चतुर्थी धांडगे,वांशिका चीताडे,प्रथम, ज्ञानेश्वरी पुंनावार द्वितीय क्रमांक प्राप्त करुन विजय मिळविला. तर १७ वर्षांपर्यंतच्या मुलिंमधून समीक्षा शेंडे प्रथम, सलोनी भंडारे प्रथम, पूर्वा कणंपल्लीवार, प्रथम, प्रगती शेंडे प्रथम,रिया चौधरी प्रथम,क्षितिजा कामडे प्रथम तनुश्री रामटेके द्वितीय क्रमांक प्राप्त करुन मुल नगरात मानाचा तुरा रोवला. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी कोच म्हणून युवाशक्ती व्यायाम मंडळाचे तेजस महाडोळे,आकाश चौधरी, करणं कोसरे यांनी अथक परिश्रम घेतले असून स्वामी विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक नितीन घरोटे व शारीरिक शिक्षक रुपचंद उराडे, यांचे अमूल्य असे मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यार्थी कुस्ती स्पर्धेत यशस्वी झाले. व विभागीय स्तरावर पोहचले. त्यामुळे युवाशक्ती व्यायाम मंडळातर्फे विजेत्या स्पर्धकांना पुष्पगुच्छ देऊन मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण चेपुरवार, कोषाध्यक्ष गुलाब पठाण,सचिव चतुर मोहूरले, सहसचिव चंदू चटारे, सदस्य वसंत मोहूर्ल, खालिद शेख, रवींद्र शेंडे,
नत्थु वाढई, प्रवीण खानोरकर, यांनी अभिनंदन व सत्कार केला. याप्रसंगी पालक अजय कामडे व जितेंद्र रामटेके यांचेही मंडळाच्या वतीने अभिनंदन केले.