News34 chandrapur
चंद्रपूर - भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चंद्रपूर दीक्षाभूमीवर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 6 डिसेंम्बर ला करण्यात आले आहे.
Blood for Babasaheb
Blood for Babasaheb
सदर रक्तदान शिबिर जगभरातून तब्बल 500 ठिकाणी व 65 सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. Blood camp
आयोजित रक्तदान शिबिराला चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 65 संघटनांचा पाठिंबा मिळाला असून या रक्तदान शिबिरात हजारो नागरिक रक्तदान करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. Chandrapur news
विशेष म्हणजे रक्तदान शिबिर चंद्रपुरात व्हावे यासाठी महार रेजिमेंट आजी माजी सैनिक संघटनेने पुढाकार घेतला.
याशिवाय भूमी अभिलेख कर्मचारी संघटना, योग नृत्य परिवार चंद्रपूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, चंद्रपूर मुस्लिम मोर्चा व भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेचा सहभाग आहे.
6 डिसेंम्बर ला आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. सिराज खान, बाळकृष्ण रामटेके, मंगेश खोब्रागडे, रोशन अलोने, बोधित्व रामटेके, प्रदीप बोरकर, सुरेश बोभाटे, प्रशांत हांडे व दुष्यंन्त नगराळे यांनी केले आहे.