News34 chandrapur
आज चंद्रपूर मनपा शाळांत दिले जाणारे शिक्षण व सुविधा यांचा दर्जा चांगला आहे मात्र आधी ही स्थिती नव्हती, खाजगी शाळेच्या तुलनेत विशेष सुविधा नव्हत्या त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती खालावली होती. मनपा शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात घरोघरी जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्व समजाविले. शाळांमध्ये ई - लर्निंगसाठी अत्याधुनिक संगणक व प्रोजेक्टर्स, रंगरंगोटी, चित्र सजावट, डेस्क बेंचेस, वॉटर कूलर्स, गणवेश इत्यादी खाजगी शाळांसारख्या सुविधा टप्याटप्याने देण्यात आल्या. Education
बदल हा घडला की, २०१५ मध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये असलेल्या २ हजार २७० विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ७० वर पोहचली. आता तर एप्रिल महिन्यातच प्रवेश बंदची पाटी लावावी लागते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मनपा शिक्षकगण यांनी घेतलेले प्रयत्न आणि मनपा प्रशासनाने दिलेल्या प्रोत्साहनाने शिक्षणाचा दर्जा वाढविण्यास मदत होत आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेस सदर मान्यता आदेश २२ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे आयोजीत कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते देण्यात आला, शिक्षणमंत्री दीपक केसरकर तसेच शिक्षण प्रधानसचिव यांच्या उपस्थितीत मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत यांनी पुरस्कार स्वीकारला. आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे,सर्व सहायक आयुक्त,शहर अभियंता महेश बारई, शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत यांच्या अथक प्रयत्नांने आज मनपा शाळेने ही उपलब्धी मिळविली आहे.
इतर नगर पालिका आणि महानगर पालिका यांच्या शाळांची परिस्थीती नाजुक असतांना चंद्रपूर मनपाच्या सर्व शाळांमधे गुणवत्ता वाढ घडवून शाळाची पटसंख्या वाढविणे, स्वयंप्रेरणा घेऊन इयत्ता ९ आणि १० वीचा वर्गविस्तार करुन गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबास शाळा सुविधा उपलब्ध करुन देणे, हेच आमचे ध्येय होते. ते पुर्ण केल्याबद्दल शिक्षणाधिकारी नागेश नीत व आमचे सर्व शिक्षक, त्यांना मदत करणारा इतर सर्व वर्ग यांचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत - आयुक्त श्री. विपीन पालीवाल.
चंद्रपूर - न थांबणाऱ्या चंद्रपूर मनपा शिक्षण विभागाच्या प्रयत्नांना यश मिळाले असुन मनपा सावित्रीबाई फुले शाळेला आता इयत्ता १० वी पर्यंत मान्यता मिळाली आहे. डिजीटल वर्ग सुरु केलेल्या मनपा शाळेला शासनाने मान्यता दिली असुन मुंबई येथे शिक्षणमंत्री यांच्या हस्ते मनपाला हा गौरव प्राप्त झाला आहे. Chandrapur municipal corporation school
शासन निर्णयानुसार कुठल्याही मनपाला इयत्ता ८ वी पर्यंत शाळा चालविण्याचे अधिकार आहेत, त्यांनंतरच्या वर्गांसाठी शासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. चंद्रपूर मनपा सावित्रीबाई फुले शाळा तसेच इतर मनपा शाळा सुरवातीला इयत्ता ४ थी पर्यंतच मर्यादीत होत्या मात्र त्यानंतर आयुक्त संजय काकडे,राजेश मोहिते आणि त्यानंतरआयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी नागेश नित यांनी गुणवत्तापुर्ण शिक्षण,शिक्षणाचा दर्जा, शाळेची परिस्थिती, दृष्टीकोन यात आमुलाग्र बदल केला. दर्जा वाढविण्यास प्रयत्न केल्याने ४ थी ते ६ वी पर्यंत त्यानंतर ८ वी पर्यंत वर्गात मुलांची लक्षणीय उपस्थिती वाढली.त्यानंतर मनपाच्या शालेय दृष्टिकोणा अंतर्गत इयत्ता १० वी पर्यंत वर्ग वाढविण्यास प्रस्ताव शासनास देण्यात आला आणि चंद्रपूर मनपा शाळांची प्रगती बघता प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. Big newsआज चंद्रपूर मनपा शाळांत दिले जाणारे शिक्षण व सुविधा यांचा दर्जा चांगला आहे मात्र आधी ही स्थिती नव्हती, खाजगी शाळेच्या तुलनेत विशेष सुविधा नव्हत्या त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती खालावली होती. मनपा शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात घरोघरी जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्व समजाविले. शाळांमध्ये ई - लर्निंगसाठी अत्याधुनिक संगणक व प्रोजेक्टर्स, रंगरंगोटी, चित्र सजावट, डेस्क बेंचेस, वॉटर कूलर्स, गणवेश इत्यादी खाजगी शाळांसारख्या सुविधा टप्याटप्याने देण्यात आल्या. Education