News34 chandrapur
चंद्रपूर - राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्ष पदी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
वरोरा शहरात अहिर यांचं आगमन झाल्यावर
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. Hansraj ahir
यावेळी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष अहिर यांनी कार्यकर्त्याना संबोधन करतेवेळी मी पराभूत झाल्यावर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला देशाच्या मोठ्या पदावर नियुक्ती केली, त्यांचं यावेळी मी आभार मानतो. National Commission for Backward Classes
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावर मी पक्ष संघटनेचे काम करण्यात सक्रिय होतो, पक्षाने ओबीसी मोर्च्याच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
त्या पदाला मी योग्य न्याय दिला, माझं पद हे चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांचा सन्मान आहे, आयोगाचा पदभार स्वीकारल्यावर ओबीसी वर्ग व सर्व वर्गातील नागरिकांना सोबत घेत मी काम करणार अशी ग्वाही हंसराज अहिर यांनी यावेळी दिली.
