News34 chandrapur
पुणे - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाइफेक प्रकरणी पिपरी चिंचवड पोलीस स्टेशनमधील 11 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून यामध्ये एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे.
Suspension of Police
Suspension of Police
शनिवारी चिंचवड येथे श्रीमान महासाधु मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव निमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले होते.
सायंकाळी कार्यक्रम आटोपून बाहेर निघत असताना अज्ञात व्यक्तीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा फुले यांनी शाळा सुरू करण्यासाठी अनुदान मागितले नाही तर त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असं वादग्रस्त वक्तव्य पाटील यांनी केलं होतं, त्यांच्या वक्तव्याचे राजभर पडसाद उमटले. Chandrakant Patil Controversial Statement
अनेक ठिकाणी पाटलांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
त्यांच्या वक्तव्याचा निषेध करीत 3 अज्ञात लोकांनी पाटील यांच्यावर शाई फेक केली, शाइफेक करतेवेळी त्या तिघांसोबत पत्रकार होता, सदर घटनेनंतर त्या पत्रकाराने व्हिडीओ व्हायरल केला, तो व्हिडीओ जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला असल्याचा पोलिसांनी दावा केला म्हणून त्या पत्रकाराला अटक करण्यात आली.
निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये 8 पोलीस कर्मचारी व 3 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.