News34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तस्करांचा युवकांना व्यसनाधीन करीत जीवघेण्या कॅन्सर आजार देण्याचे काम सुरू आहे. Aromatic tobacco smuggler
कोरोना काळात सुगंधित तंबाखू ची रोजची तस्करी फक्त चंद्रपूर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची होती, आता मात्र हा अवैध धंदा जीवनावश्यक वस्तूंच्या आड चालत आहे. Chandrapur crime
असाच पुन्हा एक छापा जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांच्या पथकाने केली, 10 डिसेंबर ला मौजा वलनी ते बोर्डा रोडवरील फॉरेस्ट चेक पोस्ट जवळील गोदामात सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी धाड मारली मात्र गोदाम बंद अवस्थेत होते, पोलिसांनी लगेच गोदाम मालक मंगेश रघाताटे यांना बोलावले असता त्यांनी सदर गोदाम हे वर्षभरापासून वसीम झिमरी यांना भाड्याने देण्यात आले आहे.
पोलिसांनी गोदामाचे दार उघडले असता त्यामध्ये 16 पांढऱ्या रंगाच्या बोऱ्यात तब्बल 4 हजार 500 पॉकेट सुगंधित सुपारी किंमत 2 लाख 70 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी वसीम झिमरी व अनवर मुन्नवर हुसेन सय्यद यांच्यावर कलम 26 (2)(i), 26 (2)(iv), 30, 2(a) व अन्न व सुरक्षा मानके अधिनियम 2006, 188, 173, 328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Oral cancer
दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे, वसीम झिमरी हा चंद्रपूर जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू तस्करांचा म्होरक्या आहे, याच्यावर सुगंधित तंबाखू तस्करी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहे.
याआधी MIDC येथील गोदामात सुगंधित तंबाखूची भेसळ सुरू होती, ते गोदाम वसीम झिमरी चे होते, त्यानंतर बाबूपेठ येथे सुद्धा अश्याच गोदामात सुगंधित तंबाखूचा साठा ठेवण्यात आला होता.
वारंवार वसीम हा जिल्ह्यातील युवकांना कॅन्सर आजार देण्यासाठी अग्रेसर आहे, त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.