News34 chandrapur
गडचिरोली: पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व माऊली सेवा मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभाग सिरोंचा अंतर्गत उपपोस्टे रेगंुठा येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या भव्य जनजागरण मेळाव्यामध्ये रेगंुठा परिसरातील 500 ते 600 नागरिकांनी मोठ¬ा प्रमाणात सहभाग नोंदविला. Gadchiroli police
सदर भव्य जनजागरण मेळाव्यांमध्ये गडचिरोली पोलीस दलातर्फे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ घेता यावा म्हणुन, पोलीस दादालोरा खिडकी सुरू करण्यात आली. या खिडकीच्या माध्यमातुन उपपोस्टे रेगंुठा हद्दीतील गोरगरीब आणि होतकरु शाळकरी मुलींसाठी 50 सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांना 50 ब्लॅकेंट, 100 साड्या, 50 कुर्ते, 150 महीलांना इतर साहीत्य व शाळकरी मुलांसाठी पेन, पेन्सील, वही तसेच इतर शालेय उपयोगी साहीत्यांचे वाटप करण्यात आले. सदर मेळाव्यात मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी उपस्थित नागरीकांना संबोधित करतांना सागीतले की, पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून हद्दीतील सर्व जनतेच्या व विद्याथ्र्यांच्या कोणत्याही प्रकारची कामे, अडचणी पोलीस दलातर्फे सोडविल्या जातील. तसेच पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून कोणकोणत्या योजनांचा लाभ नागरिक घेऊ शकतात, याबाबत मार्गदर्शन केले. पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून आजपावेतो 2,78,471 नागरिकंापर्यत विविध योजनांचा लाभ पोहचविण्यात आला आहे.
सदर मेळाव्यास मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, (अहेरी) श्री. यतिश देशमुख सा. तसेच श्री. सुहास खरे, अध्यक्ष, माऊली सेवा मंडळ, नागपूर हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा श्री. सुहास शिंदे, उपपोस्टे रेगुंठाचे प्रभारी अधिकारी श्री. विजय सानप, पोउपनि. सागर पाटील, पोउपनि. निजाम सय्यद, एसआरपीएफचे ग्रुप जालनाचे पोउपनि. श्री. बच्चेवार व पोउपनि. श्री. शेंडे, उपपोस्टे रेगुंठा येथील सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

