News34 chandrapur
चंद्रपूर - औद्योगिक व प्रदूषित जिल्हा म्हणून चंद्रपूर ची ओळख आहे, आता तर चंद्रपूरचे प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यावर हानिकारक दुष्परिणाम करीत आहे. Most polluted city in world
याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी सदर अहवालाबाबत माहिती दिली.
थंडीचा महिना नोव्हेम्बर मध्ये तब्बल 30 दिवसांपैकी 29 दिवस चंद्रपूर प्रदूषणाने वेढला होता.
Air pollution chandrapur
नोव्हेंबर ठरला प्रदूषनाचा महिना
हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोव्हेंबर महिन्याच्या आकडेवारी त स्पष्ट होते. एकूण 30 दिवसाच्या महिन्यात 29 दिवस प्रदूषण आढळले तर केवळ 1 दिवस प्रदूषण मुक्त होता.
गुणवत्ता पाहिल्यास 22 दिवस साधारण (Moderate) प्रदूषित तर 7 दिवस अत्यंत प्रदूषित (Poor) दिवस आढळले.
नोव्हेंबरमध्ये खालील तारखाना (1,7,11,15,22,29,30) मध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (A Q I -- 201 ते 280 ) असून हे दिवस अति प्रदूषित आढळले .19 नोव्हेंबर हाच एकमेव दिवस शहरासाठी चांगला होता तर उर्वरीत 22 दिवस अतिशय प्रदूषणाचे होते.(AQI- 165 ते 195)
-------------------
AQI-
0-50 चांगला
51-100 साधारण प्रदूशीत
101-200 प्रदूषित
201-300 अति प्रदूषित
301-400 धोकादायक
आरोग्यावर काय परिणाम
1) 0 ते 50 AQI (Air quality index) हा आरोग्यासाठी चांगला
2) 51 ते 100 हा आधीच श्वसनाचे रोग्यासाठी त्रासदायक
3) 101 ते 200 दमा,श्वसनाचे रोग आणि हृदय रोग्यासाठी धोकादायक
4)201 ते 300 सर्व नागरिकासाठी धोकादायक असते..
प्रा सुरेश चोपणे,चंद्रपुर
