News34 chandrapur
चंद्रपूर - जगप्रसिद्ध ताडोबा जंगलात पुन्हा 4 वाघांचा मृतदेह मिळाल्याने वन्यप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. Chandrapur tiger
मागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर आणखी आज चार बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. Tadoba tiger cube ताडोबाच्या बफर झोन मधील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगलात चार बछडे मृत अवस्थेत आढळून आले. Chandrapur breaking news
मोठ्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे याबाबत वन विभागाने अद्याप पर्यंत अधिकृत माहिती दिलेली नाही सूत्राने दिलेल्या माहितीनुसार चार बछडे जंगलात आढळून आले होते या संदर्भात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पंचनामा करण्यात येत आहे.
