News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा आता वाघांचा जिल्हा म्हणून उदयास येत आहे कारण जिल्ह्यात दररोज मानव-वन्यजीव संघर्षात मोठी वाढ होताना दिसून येत आहे.
आता नागरीक वाघाच्या भीतीने शेतात जायला सुद्धा घाबरू लागले आहे, मात्र चंद्रपुरात हे उलट चित्र आहे, काहीजण जाणूनबुजून वाघाच्या हद्दीत जात आहे. Gambling in chandrapur forest
हे दुसरे कुणी नसून चंद्रपुरातील जुगार बहाद्दूर आहे, पोलीस जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करीत असून आता हे जुगार खेळणारे सुरक्षित ठिकाण शोधत आहे, वन्यजीव क्षेत्रात जुगाराचा खेळ रंगत चालला आहे, मात्र एक दिवस या बहाद्दरांची शिकार होणार हे मात्र खरे, पण शिकारी पोलीस, वनविभाग की वाघ असणार ही तर येणारी वेळ ठरवेल.
Chandrapur police
जिल्ह्यातील अवैध धंद्यांना पोलिस खात्याने ऑपरेशन ऑल आऊट चालवत संपवण्याचा डाव जरी आखला तरी पोलिस खात्यातील काही कर्मचारी अद्यापही नंबर 2 च्या धंद्याला पसंती दर्शवत आहे. अजूनही घुघुस,चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, राजुरा, सिंदेवाही, नागभिड, मुल, या ठिकाणी बरेच अवैध धंदे अद्यापही पोलिसांच्या नाकावर टीचून सुरू आहे. नुकतेच महिनाभर आधी रुजू झालेले पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी अवैध धंद्यावर क्राइम मीटिंग मध्ये कारवाई करण्याचे आदेश दिले. पण या आदेशाला काही जिल्ह्यातील पोलिस स्टेशन कर्मचारी केराची टोपली दाखवत असल्याचे दिसतं आहे. टोपली दाखवणाऱ्या संबंधित पोलिस स्टेशन च्या हद्दीत काही दिवसापूर्वीच एसपी यांच्यां विशेष पथकाने कारवाई केली आहे हे विशेष. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनीही अनेक ठिकाणी धाड सत्राची मोहीम राबवली आहे हे विशेष. Tadoba forest
जिल्ह्यातील रामनगर पोलिस स्टेशन च्या हद्दीत वनविभागाच्या अंतर्गत येत असलेल्या जूनोना जंगल च्या आतील भागात रोज 50 ते 60 युवकांचा ताफा सर्रास रोज जुगार खेळत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
लाखोंचा जुगार या ठिकाणी सुरू असून या ठिकाणी वाघाचा वावर सुध्दा असल्याचे बोलल्या जात आहे. काही शासकीय कर्मचारी सुध्दा हा जुगार खेळण्यात मग्न आहे. जंगल परिसराची जवाबदारी रखणारेच कायद्याची पायमल्ली सर्रास करत असल्याचे दिसत आहे. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी सुरू असलेल्या जुगाराला ही पोलिस प्रशासन आटोक्यात आणू नाही शकले. वनविभागाच्या अधीन सुरू असलेला हा जुगार एखाद्या दिवशी जंगल प्राण्याची शिकारीची की वाघाच्या जबड्यात फसण्याची वाट बघत आहे की काय? असे चित्र दिसत आहे.
वनविभाग नेहमी लाकूड तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करते मात्र हा जुगार त्यांच्या नजरेखालून वाचला कसा हा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.
पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित यावर अंकुश लावून जुगार भरविण्यावर कारवाई करावी. एरव्ही मोठ्या प्रमाणात वाघाचे हल्ले वाढलेले असताना वाघाच्या गुहेत जाणाऱ्याना वनविभाग पाठीशी तर नाही घालीत आहे यावर आता प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.