News34 chandrapur
यवतमाळ - रविवार 4 डिसेंम्बर ला लोनीजवल कार आणि बसचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू तर 13 प्रवासी जखमी झाले. A terrible accident
सकाळी साडेदहा वाजता राळेगाव आगारातील बस यवतमाळवरून अमरावतीला जायला निघाली होती. Bus and car accident
त्यावेळी अमरावती वरून यवतमाळ कडे कार क्रमांक MH29BC9173 मध्ये 3 कुटुंबातील 7 जण प्रवास करीत होते, त्यावेळी लोणी जवळ बस व कार ची समोरासमोर भीषण धडक झाली.
या अपघातात कार चालक राधेश्याम इंगोले व त्याची आई रजनी इंगोले यांचा जागीच मृत्यू झाला.
तर यवतमाळ रुग्णालयात उपचारादरम्यान वैष्णवी गावंडे व सारिका चौधरी यांचा मृत्यू झाला.
मृतकांमध्ये 26 वर्षीय अभियंता राधेश्याम इंगोले, 45 वर्षीय रजनी इंगोले, 18 वर्षीय वैष्णवी संतोष गावंडे, 28 वर्षीय सारिका प्रमोद चौधरी तर जखमीमध्ये 19 वर्षीय साक्षी प्रमोद चौधरी, 45 वर्षीय प्रमोद पांडुरंग चौधरी, 44 वर्षीय सविता संतोष गावंडे यांचा समावेश आहे.
एसटी बस मधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. रुग्णसेवक शंकर भागडकर, नाना घोंगडे, राजेश खोडके, प्रमोद राणे यांनी प्रसंगावधान राखत जखमींना तातडीने नेर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यवतमाळ येथे जखमींवर उपचारानंतर दोन महिलांना नागपूर येथे हलवण्यात आले आहे.
