चंद्रपूर - चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या आशिर्वादाने 4 वेळा खासदार म्हणून निवडून आलो, जनसेवा करण्याची संधी दिली, चंद्रपूरकरांचा ऋणी असून मा नरेंद्र मोदी जी व पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपदी निवड करुन चंद्रपूरकरांचाच नाही तर महाराष्ट्राचा सन्मान केला असल्याचे प्रतिपादन दि 03 डिसेंबर रोजी स्थानिक गांधी चौक येथे मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी व भाजपा पक्ष श्रेष्ठींचे आभार व्यक्त करण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चा, अनु. जाती मोर्चा, अनु. जमाती मोर्चा, भटक्या-विमुक्त जाती मोर्चा, अल्पसंख्यांक मोर्चा, भाजपा महिला मोर्चा, वैद्यकिय आघाडी तर्फे आयोजित सभेत नवनियुक्त राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी केले. Chandrapur loksabha
सदर सभेस पद्मश्री माजी खासदार विकास महात्मे, वणीचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश महामंत्री संजय गाते, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा महानगर अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, ओबीसी मोर्चाचे विदर्भ संघटक रविंद्र चव्हाण, खुशाल बोंडे, अंजलीताई घोटेकर, अनिल फुलझेले, अल्काताई आत्राम, राजेश मून, राजेंद्र गांधी, डॉ. एम. जे. खान, दिनकर पावडे, तारेंद्र बोर्डे, राजू घरोटे, विजय चोरडीया, ब्रिजभूषण पाझारे, विनोद शेरकी, प्रकाश राठोड, विजय पिदुरकर, रत्नमालाताई भोयर, विवेक बोडे, रघुवीर अहीर, संजय तिवारी, रविंद्र गुरनुले, राजू गायकवाड, जुम्मन रिजवी, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर रवि लोणकर, अरुण तिखे, मोहन चौधरी, धनराज कोवे, धम्मशिल भस्मे, अमिन शेख, दिवकार पुध्दटवार, राजू येले, राजू कागदेलवार, प्रदिप किरमे, शशीकांत मस्के, शैलेश इंगोले, यांची प्रमुख उपस्थिती होती. Bjp Hansraj ahir
अहीर पुढे म्हणाले, कॉंग्रेसने आपल्या सत्ता काळात ओबीसी प्रवर्गासाठी कोणतेही काम केले नसल्याचे सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओबीसी प्रवर्गाला न्याय देण्यासाठी ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला. मोदींनी कौशल्य विकास मंत्रालय स्थापन केले ज्याचा सर्वात जास्त फायदा ओबीसी प्रवर्गातील जातींना होत असल्याचेही ते म्हणाले. कोणत्याही जातीला आरक्षण देण्याचा अधिकार आयोगाच्या अध्यक्षाला नसून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी कटिबध्द असल्याचे अहीर म्हणाले. महाराष्ट्रातील सर्व ओबीसी प्रवर्गातील जातीनां ओबीसींसाठी असलेल्या योजनांचा फायदा देण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. Obc reservation
चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे आरक्षण कमी असून या जिल्ह्यांमध्ये 27 टक्के आरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणार असेही ते म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ वेकोलि मधील प्रकल्पग्रस्तांना 11,000 च्या वर नौकऱ्या उपलब्ध 2343 कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला त्यामध्ये 85 टक्के ओबासी प्रवर्गातील प्रकल्पग्रस्त असल्याचे अहीर म्हणाले, ही सभा मा. प्रधानमंत्री भाजपा पक्ष श्रेष्ठी व जनतेचे आभार माणण्यासाठी आयोजित केली असून सर्वाचे आभार त्यांनी यावेळी मानले. यावेळी डॉ विकास महात्मे, संजय गाते, संजय धोटे, डॉ मंगेश गुलवाडे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खुशाल बोंडे, संचालन अंजलीताई घोटेकर यांनी केले व आभार प्रदर्शन ब्रिजभूषण पाझारे यांनी केले.