News34 chandrapur
चिमूर - शहरातील धर्माजी नागोसे यांना 6 मुले होती, मृत्यूपूर्वी त्यांनी शेतीचे समान हिस्से सर्व मुलांना वाटत एक हिस्सा स्वतःजवळ ठेवला, प्रभाकर धर्माजी नागोसे यांनी वडील धर्माजी व त्यांच्या पत्नीचा मरेपर्यंत सांभाळ केला, वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या शेतीमधील हिस्सा प्रभाकर यांनी स्वतःजवळ ठेवला.
Chandrapur murder news
Chandrapur murder news
प्रभाकर यांना अपत्य नव्हते, ते प्लॉट विक्री करीत पैसे कमवित होते, दोन वर्षांपूर्वी त्यांनी नवे घर सुद्धा बांधले, मात्र प्रभाकर ची प्रगती त्याच्या पुतण्या 39 वर्षीय रुपेश पतरू जी नागोसे याला खुम्पत होती. Murder crime
याचाच राग रुपेश याच्या मनात नेहमी होता, आपण मजुरी करीत राबराब राबून पैसे कमवित आहो आणि काका हा काही न करता प्रगती करीत आहे असा विचार त्याच्या मनात नेहमी येत होता, काका चा काटा काढायचा असा विचार डोक्यात घेऊन त्याने बुट्टीबोरी वरून 27 डिसेंम्बरला थेट चिमूर गाठत काकांच्या घरी गेला.
काका घरी नसल्याचे बघून त्याने काकी सोबत वाद घातला, मात्र त्यावेळी काका घरी येताना रुपेश ला दिसला त्याने लाकडी स्टूल तोडत त्याचा दांडका सोबत घेत काका च्या दिशेने निघाला, आधी काका सोबत वाद घातला त्यांनतर रुपेश ने प्रभाकर यांच्यावर दांडक्याने वार केले, या हल्ल्यात प्रभाकर यांचा जागीच मृत्यू झाला.
रुपेश ने काकी ला कुणाला सांगितलं तर तुला सुद्धा ठार करेल अशी धमकी देत घटनास्थळी असलेले रक्त पाण्याने साफ करीत तिथून पळ काढला. Chandrapur crime
दुसऱ्या दिवशी एका महिलेने या घटनेबाबत फिर्याद नोंदविली, तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी रुपेश ला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कलम 302, 201, 341 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला, पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.