News34 chandrapur
चंद्रपूर - सैशंकाई शितो RYU कराटे असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र व तेलंगाणा राज्यातील कराटे पटूसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Karate championship 2022
या स्पर्धेत महाराष्ट्र व तेलंगाणा राज्यातील अनेक स्पर्धकांनी मोठ्या संख्येत सहभाग दर्शविला, अनेक कराटे असोसिएशनने या स्पर्धेत भाग घेतला.
कराटे प्रथम खुली स्पर्धा 2022 च्या अटीतटीच्या लढतीत चंद्रपूर जिल्ह्यातील Fit To Fight क्लब च्या 14 वर्षे वयोगटातून माहीन सिकंदर खान ने प्रथम क्रमांक पटकवीत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
माहीन ने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व फिट to fight च्या सदस्य व प्रशिक्षकांना दिले आहे.
माहीन च्या यशावर अनेकांनी तिचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.