News34 chandrapur
चंद्रपूर - पडोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार विहिरीच्या पाण्याचा वापर स्थानिक नागरिक करीत असतात, परंतु सुरक्षा जाळी विहिरींवर नसल्याने विहरीचे पाणी गढूळ झाले होते. तसेच मागील काही काळात विहिरीत आत्महत्येचा घटना या घडल्या होत्या. Chandrapur mns
भविष्यात अश्या घटना घडू नये यासाठी त्वरित निधीचे आयोजन करून लोखंडी जाळी बसविण्याची मागणी मनसे तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर यांनी केली होती.
यावर त्वरित कारवाई करीत पडोलीचे सरपंच विकी लाडसे यांनी निधीची उपाययोजना करून सात दिवसाच्या आत विहिरींवर लोखंडी जाळी बसवून मनसेच्या मागणीची पूर्तता केली.
