News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - ग्रामीण मच्छिमारांना संपविण्यासाठी आणि खाजगी ठेकेदारांना तलाव देऊन मच्छिमारांना मजूर बनवून ठेण्यासाठीच अत्यंत किचकट जाचक अटी टाकून 3 जुलै 2019 चा शासन निर्णय काढला.
ज्या सोसायटीला तलाव घ्यायचे आहे त्यांनी मच्छिमार अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र सादर करावे लागणार असे आदेश केले. तसेच तलावात मत्स्यबीज सोडण्यासाठी अगोदर १० टक्के रक्कम अधिकाऱ्यांकडे भरावे असे शासन निर्णयात अट घातली. मच्छिमार सहकारी संस्थांना तुमची संस्था जिवंत आहे का याबाबत पुरावा म्हणून अधिकाऱ्यांचा संस्था नूतनीकरण परवाना सादर केल्याशिवाय कोणत्याही संस्थेला तलाव घेता येणार नाही. अशी अट ठेवल्यामुळे एकही सोसायटी तलाव घेऊ शकणार नाही. आणि १६० संस्थेमधील ३२ हजार कुटुंब वाऱ्यावर पडून उपाशी मरतील यासाठी असंख्य गरीब मच्छिमार भाजपच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री शोभाताई फडणविस यांचेकडे निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटून आमचा जिव्हाळ्याचा व पोटाचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली.
याबाबत शोभाताई फडणविस यांनी आलेल्या शेकडो मच्छिमारांना तुमचा प्रश्न हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचे आश्वासन देऊन त्यांना मार्गदर्शन करुन शासनाकडे राज्याचे उपमुख्यमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फतीने तात्काळ पाठपुरावा केला असता शासनाने याची गंभीर दखल घेऊन

दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी शासन परिपत्रक काढून राज्यातील तलावांमधे आणि धरणांमधे मासेमारी करणाऱ्या करीता तात्काळ दि. 3 जुलै 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना यापुढे परवाना नूतनीकरण करण्याकरीता मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा ना हरकत प्रमाणपत्राची गरज राहणार नाही, असा शासन आदेश ३० नोव्हेंबर २०२२ रोजी राज्य शासनाने काढल्याने या नवीन शासन निर्णयामुळे राज्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या आशा पल्लवित झाल्याने सर्वानाच मोठा दिलासा मिळाला असल्याचे शोभाताई फडणविस यांनी स्वगृही घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. याप्रसंगी महेंद्र करकाडे,अविनाश जगताप,संजय मरकवार,नितीन भालेराव,लोकनाथ नर्मलवार, साहिल येंगंटीवार उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना तलावात मासेमारी करण्याकरता अथवा मत्स्यपालन करण्याकरीता पंचवार्षिक परवाना दिला जातो. त्यांचे नूतनीकरण करतांना शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे पूर्वी आवश्यक होते. या किचकट प्रक्रियेमुळे मच्छिमार सहकारी संस्थांना परवाना नूतनीकरणासाठी जाचक अटी आड येत होत्या त्या नव्याने काढलेल्या निर्णयाने दूर झाल्याने मच्छिमार सहकारी संस्थांसाठी परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील हजारो मच्छिमार सहकारी संस्थांचा फायदा होऊन खरे मच्छिमारच आता मालक राहणार आहेत. करीता सर्व संस्थांचे पदाधिकारी ,सदस्य,यांनी माजी मंत्री शोभाताई फडणविस यांचे जाहीर आभार मानले आहे. मत्स्य विभाग उपायुक्त व मच्छिमार अधिकाऱ्यानी केले शोभाताईंचे अभिनंदन मच्छिमार करणाऱ्या संस्थांचे आणि प्रत्यक्ष सदस्य यांचा महत्वाचा व पोटाचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावून आम्हालाही दिलासा दिल्याबद्दल १ डिसेंबर २०२२ रोजी मत्स्य विभागाचे प्रादेशिक उपायुक्त नागपूर मान.संदीप दप्तरदार , मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी चंद्रपूर निखिल नरड, यांनी मुल येथे माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे गृही प्रत्यक्ष येऊन त्यांचा आदर सत्कार व अभिनंदन केले आणि जाहीर आभारही मानले. याप्रसंगी वाल्मिकी मत्स्य संस्थेचे सभापती जितेंद्र टीगुसले ,पदाधिकारी राजू जराते,संजय पोहनकर, कवडू कोल्हे असे अनेक सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी माजी मंत्री शोभाताई यांचे विश्वासू अविनाश जगताप,महेंद्र करकाडे ,संजय मारकवार, लोकनाथ नर्मलवार,नितीन भालेराव, साहिल येंनगंटीवार,भगवान ढोरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.