News34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हरीश ससनकर राज्य सरचिटणीस तथा अन्य राज्य पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. ०४ डिसेंबर २०२२ ला व्ही. के.हायस्कूलचे कॉन्फरन्स हॉल, पनवेल जिल्हा रायगड येथे संपन्न होणार आहे. Teachers Association
सभेला सर्व राज्य पदाधिकारी व जिल्हा प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर राज्य सभेमध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या समस्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच या प्रश्नांच्या पूर्ततेसाठी शासन प्रशासनाकडे संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे यावेळी राज्यातील सर्व जिल्ह्याचे संघटना प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती वसंत मोकल जिल्हाध्यक्ष रायगड, किशोर आनंदवार जिल्हाध्यक्ष, संजय चिडे जिल्हा सरचिटणीस चंद्रपूर यांनी दिली आहे.