News34 chandrapur
चंद्रपूर - देशातील प्रत्येक क्षेत्रात अदानी समूहाने उडी घेत स्वतः नाव उंचविण्याचे काम सुरू करीत देशाची भांडवलशाही कडे वाटचाल सुरू केली आहे. Adani group
आता अदानी समूह वीज क्षेत्रात पाय ठेवत ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उरण व तळोजा विभागासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे समांतर परवाना साठी अर्ज दाखल केला आहे, जर अदानी समूहाला परवाना मिळाला तर महापारेशन, महावितरण व महानिर्मिती अदानी समूहाच्या ताब्यात जात वीज क्षेत्र पूर्णपणे खाजगी होत डबघाईला येणार याकरिता राज्यातील तब्बल 30 वीज संघटनांनी एकत्र पुढाकार घेत खासगीकरणाचा विरोध दर्शवित श्रुंखलाबद्ध आंदोलनाची सुरुवात केली अशी माहिती पत्रकार परिषदेत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली. Adani power
अदानी समूहाच्या ताब्यात राज्यातील वीज क्षेत्र गेले तर ग्राहकांना मिळणारी सबसिडी पूर्णपणे संपणार, राज्याच्या वीज उद्योगावर त्याचे विपरीत परिणाम होणार, वीज दरवाढीचा फटका बसेल.
याआधी राज्यात अनेक ठिकाणी महावितरण द्वारा खाजगीकरणाचा प्रयोग करण्यात आला होता मात्र तो पूर्णपणे फसला. Mahavitran
सध्या वीज संघटनां 23 नोव्हेंम्बरला नागपूर अधिवेशनावर महाविराट मोर्चा काढत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार आहे.
29 डिसेंम्बर पासून राज्यभर द्वार सभा घेण्यात येणार आहे, 2 जानेवारीला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, 4 जानेवारी रोजी 72 तासांचा संप, 16 जानेवारी ला द्वारसभा त्यानंतर 18 जानेवारी पासून बेमुदत संप करण्याचा इशारा वीज संघटनांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. Mahapareshan
आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेनेचे केंद्रीय सरचिटणीस नरेंद्र रहाटे,देवराव कोंडेकर,सुभाष शेडमाके, एम एस ई वर्कर्स फेडरेशन शाखाध्यक्ष अमोल मोंढे,विजय भोयर, ग्रॅज्युएट इंजिनिअर्स असोसिएशनचे परेश इटकळकर, सुशील ठावरी,सबर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे संयुक्त सचिव नितीन काळे ,राहुल कीर्तने,विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे विनोद ताजने, ब्रह्मांनंद शेंडे ,महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे वसंत काळे, मारोती पिपळशेंडे,एम एस ई बी वर्कर्स युनियन (पॉवर फ्रंट) चे अभय मस्के, इब्राहिम शेख,
महाराष्ट्र राज्य विद्युत बहुजन अधिकारी कर्मचारी संघटनचे आर एच वर्धे, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अधिकारी अभियंता सेनाचे
केंद्रीय सचिव मिलिन्द कोटरंगे, जयंत तायडे , बहुजन पाॅवर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय श्रीकांत राय आदींची उपस्थिती होती. Mahanirmiti