News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल तालुक्यातील मौजा चीचाळा येथे अवैध रेती चोरीचा व्यवसाय जोरात चालत असल्याने ट्रॅक्टर मालकाच्या आदेशाने अधिकाधिक रेतीच्या ट्रिप व्हाव्या ह्या हव्यासापोटी ट्रॅक्टर ड्रायव्हर याने भरधाव वेगाने चीचाला वरुन हळदी मार्गे जात असताना गावापासून काही अंतरावर मजुरीच्या कामावर जाणाऱ्या दोन मजुरांना जोरदार धडक दिली.
Road accident
या अपघातात शरद विलास लेंनगूरे वय (२५) व निखिल सुनील निकेसर वय (२३) यांना दिलेल्या धडकेत दोघेही. गंभीर रित्या जखमी झाल्याने एकाचा पाय चांगलाच चिरला तर दुसऱ्या ला डोक्याला मार लागला.जखमींना मुल येथे उपजिल्हा रुग्णालय असताना देखील नेले नाही. Sand mafia in chandrapur
ट्रॅक्टर प्रवीण बोबाटे यांच्या मालकीची असून ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.34 पी.एफ.1273 आहे. जखमींना खाजगी वाहनाने तात्काळ चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे समजले असून अपघात अपघात स्तळवरून रेती चोरीचा भांडा फुटेल या भीती पोटी ट्रॅक्टर मधील रेती घराच्या मागे टाकून ट्रॅक्टर तात्काळ इतरत्र हलविल्याचे समजले असून ट्रॅक्टर ड्रायव्हर मोहन नीकुरे फरार झाल्याचे कळले. याबाबतची माहिती पोलिसांना सुद्धा माहित होऊ दिली नाही.
