News34 chandrapur
बल्लारपूर - तालुक्यातील बामणी येथे 22 डिसेंम्बरला पहाटे 5 वाजता नागरिकांसोबत अस्वलीने मॉर्निग वॉक केल्याची बाब उघडकीस आली. Viral Video
चारही बाजूने जंगलाने वेढलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विविध मार्गावर वन्यप्राणी आता सहज भ्रमण करू लागले आहे, काही दिवसांपूर्वी सिंदेवाही येथे मॉर्निग वॉक करताना एकाला अस्वलीने जखमी केले होते. Wild animals
आता तसाच प्रकार चंद्रपुरातील बामणी येथे घडला असून अस्वल बल्लारपूर मार्गावरून धावत असल्याचा व्हिडीओ पुढे आला आहे.
मागील 5 दिवसापासून ही अस्वल या परिसरात अनेक नागरिकांना दिसली आहे. Chandrapur news
वनविभागाचे अधिकारी भोवरे यांनी सांगितले की ही अस्वल अनेक नागरिकांना दिसली असून वनविभागाची नजर त्या अस्वलीवर आहे, वनविभागाचे कर्मचारी त्या मार्गावर गस्त करीत आहे, वेळ पडल्यास पिंजरा लावून त्या अस्वलीला पकडण्यात येईल, सध्या बोराचं सिजन असल्याने अस्वल शहरातील काही भागात फिरत आहे.