News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल: तालुक्यातील चीरोली परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन महिन्यात वाघाने हल्ला करून ३ नागरिकांचा बळी घेतला असल्याने शेतकरी, मजूर वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मात्र वनविभागाकडून मानव वण्यजीव संघर्ष टाळण्याकरिता कुठलीही कार्यवाही होताना दिसत नसल्याने अखेर चीरोली येथील शेकडो महिलांनी वनविभाग कर्यालावर धडक देऊन त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी करीत मुल क्षेत्रसहाय्यक एम. जे. खनके यांना निवेदन दिले. Human Wildlife Conflict
यावेळी यावेळी मुल पंचायत समितीच्या माजी सदस्या वर्षा लोनबले, चिरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मीनल लेनगुरे, माजी उपसरपंच कविता सुरमवार, सदस्य धीरज वाळके, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रामटेके सह गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या.
Tadoba tiger
मुल तालुक्यातील अनेक गावे ताडोबा बफरझोन क्षेत्राअंतर्गत येतात. बफर झोन क्षेत्रात वन्यप्राण्यांचे वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मानव-वन्यप्राणी संघर्षात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मात्र मानव वन्यप्राणी संघर्ष टाळण्याकरिता वनविभागाकडून ठोस पाऊल उचलले जात नसल्याने नागरिकांमध्ये वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.