News34 chandrapur
नागपूर/चंद्रपूर - सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या विधान सभेत्त चंद्रपूरच्या प्रदुषणाच्या गंभीरतेवर मा आमदार किशोर जोरगेवार ह्यांनी विचारलेल्या प्रश्नावर चंद्रपूर च्या प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा आरोग्य विभागाने मंत्र्यांना दिलेली माहिती ही अपूर्ण आणि दिशाभूल करणारी आहे.
२००५-०६ साली प्रशासनाने केलेला आरोग्य अहवाल ,२०१७ मध्ये रुग्णालयातून माहिती अधिकारात मिळालेली माहिती आणि चंद्रपूर शहर वायू प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा ह्या बद्धल ची सत्यता लपविण्याचा प्रयत्न झाला असून शहरात प्रदूषण नसून कुणालाही रोगराई आणि मृत्यू झालां नसल्याचे उत्तरात म्हटले आहे. Air pollution in chandrapur
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ह्यांचे आकडेवारी नुसार २०२१ मध्ये चंद्रपूर वर्षातील ३६५ दिवसापैकी २३४ दिवस प्रदूषित श्रेणीत होते,हीच आकडेवारी अनेक वर्षापासून आहे म्हणूनच येथील सेपी निर्देशांक ७६.४१ असून अतिशय प्रदुशीत श्रेणीत येतो आणि म्हणूनच शासनाने अनेकदा प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.दहा वर्षापूर्वी येथे उद्योगबंदी लागू करावी लागली होती.२००५-०६ वर्षी जिल्हा आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ओउद्योगिक क्षेत्रातील ५० % नागरिक हे विविध रोगाने ग्रस्त असल्याचे म्हटले होते,२०१७ मध्ये माहितीच्या अधिकारात रुग्णालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार हजारो नागरिकांना प्रदूषणामुळे विविध रोगाने ग्रासले असल्याची लेखी माहिती दिली आहे.
दर वर्षी हिवाळ्यात चंद्रपूरचा वायू गुणवत्ता निर्देशांक अनेक दिवस 300 च्या वर असतो,सावरकर चौकात मागिल वर्षी कृत्रिम हृदय लावून भयानक प्रदूषणाची सत्यता समोर आली, चंद्रपुर च्या डॉक्टरांनी प्रदूषण आधारित रोगराईचा अभ्यास केला आणि प्रदूषण मुळे मृत्यु ची सत्यता पुढे आणली.असे असतानाही खरी माहिती सभागृहाला आणि जनतेला न देता चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देवून प्रशासनाने कृती आराखड्याची अंमल बजावणी न करता लोकांच्या आरोग्याशी खेळ चालविला असल्याचे ह्या उत्तरावरून लक्षात येते. Air pollution
किती फसवा आहे प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा
जिल्ह्यातील ४ ओउद्योगिक क्षेत्रासाठी आतापर्यत अनेक आराखडे कागदावर तयार करण्यात आले आहेत मात्र प्रत्यक्ष त्यांची अंमलबजावणी फारशी झाली नसल्याचे दिसते.२०२० मध्ये महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रण निकष पूर्ण न करणाऱ्या १७ शहरासाठी अक्शन प्लान लागू केला होता.चंद्रपूरला त्यासाठी १० लाखाचा निधीसुधा आलां होता परंतु कोरोनाच्या पार्श्व भूमीवर त्यावर काहीसे निर्बंध आले होते,परंतु गेल्या वर्षी करोना निर्बंध उठल्यावर पुन्हा ह्या आराखड्यावर अंमलबजावणी अपेक्षित होती.समित्या स्थापन करायच्या होत्या.किती काम झाले हे प्रशासनाच सांगू शकेल.
आराखडा कसा तयार करण्यात आला
ह्या आराखड्यासाठी शहरातील वायू प्रदूषण नोंदले गेले,थर्मल पाँवर स्टेशन ,खाणी आणि उद्योगांचे प्रदूषण नोंदले गेले,शहरातील सर्व वाहनाच्या प्रदूषणाची आकडेवारी गोळा केली गेली,घरगुती,रस्ते,बांधकाम, स्मशान भूमी,कोळसा,कचरा ज्वलन,अश्या शहरातील घरगुती आणि व्यावसाईक क्षेत्रातील प्रदूषनाच्या नोंदी घेण्यात आल्या.आणि त्यानंतर
खालील उपाय योजना सुचविण्यात आल्या होत्या
,ह्या सर्व सूचनांची अंमल बजावणी करण्यासाठी ३ ,६ ,१२ महिने ते २ वर्षाचा कालावधी देण्यात आला होता,उपाय योजनांची पूर्तता करण्याची जिम्मेदारी प्रामुख्याने महानगर पालिका,रस्ते बांधकाम विभाग,आर टी ओ आणि समंधित उद्योग ह्यांचेकडे होती.
उपाय योजना खालील प्रमाणे---
१-प्रदूषणकारी वाहनावर आर टी ओ द्वारे सक्त कारवाई करणे., २) व्यावसाईक वाहनांना ८ वर्षानंतर परवानगी न देणे , ३) शहरासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु करणे ,४) शहरासाठी बायपास तयार करणे.,धुळीवर नियंत्रण आणणारी यंत्रणा आणणे , रस्ते बांधताना नव्या पद्धतीने बनविणे,शहरातील बांधकामाची धूळ नियंत्रित करणे,५) सिमेंटचे रस्ते बांधणे,६) व्यवस्थित घनकचरा संकलन आणि कचरा जाळन्यावर नियंत्रण आणणे,७)शहरात बायो गेस प्लांट उभारणे,कम्मुनिटी लेवल बायोगेस यंत्रणा उभारणे,८) स्मशान भूमीत लाकडे न जाळता प्रदूषण न करणारे इंधन जाळणे, ९) बेकरी,हॉटेल्स मध्ये केवळ एल पी जी इंधन वापरास परवानगी देणे १०),थर्मल पाँवर प्लांट साठी उच्च दर्जाचा कोळसा पुरवठा करणे,नियामित् अम्मोनिया डोझिंग करणे,राखेचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे,उपयोग करणे ,व्यवस्थित प्रदूषण आकडेवारी गोळा करणे ११) ,कोळसा खानिनी धुळीवर नियंत्रण करणाऱ्या यंत्रणा उभारणे,झाकलेले ट्रक्स वापरणे, मातीच्या ढिगार्यांचे व्यवस्थापन करणे,१२) सिमेंट उद्योगासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्रणांची दुरुस्ती आणि देखभाल करणे, वायू प्रदूषण अंदाज देणारी यंत्रणा सुरु करणे,रस्ते सफाई आणि वाहतुकीमुळे धूळ होऊ न देणे इ उपाय योजना सुचविण्यात आल्या होत्या.
ह्यातील अनेक उपाय् योजना ह्या गेली १० वर्षापासून वेग वेगळ्या आराखड्यात सुचविल्या गेल्या आहेत आणि इथे कोपी पेस्ट केल्या आहेत. अजूनही त्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत.हे प्रशासनाचे केवळ कागदाचे आणि आकडेवारीचे खेळ असून गेल्या १० वर्षापासून प्रदूषण जैसे थे च आहे. शासनाला खरोखरच प्रदूषण कमी करून लोकांचे आरोग्य जोपासायचे असेल तर युद्ध पातळीवर नागरिकांसाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागेल.
प्रा सुरेश चोपणे
पर्यावरण अभ्यासक
अध्यक्ष -ग्रीन प्लॅनेट सोसायटी,चंद्रपूर