News34 chandrapur
चंद्रपूर - संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत असतांना प्रत्येक जिल्ह्यातील प्रश्न,विशेषतः महिलांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न मी करीत आहे.या दौऱ्यातील संपर्कामुळे जनतेला सरकार कडून असलेल्या अपेक्षा या देखील कळत आहे. Chitra wagh in chandrapur
भाजपाच्या एका महिला पदाधिकारीने दारूबंदीचा विषय सखोल अभ्यास करून मांडला आहे.दारूचा फटका महिलांनाच सहन करावा लागतो.यात दुमत नाही. महिलांच्या या संदर्भातील तक्रारी लक्षात घेतल्या तर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली पाहिजे,पण ती प्रभावी असावी.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे संवेदनशील नेते आहेत,यासाठी आपण त्यांचेशी प्रत्यक्ष चर्चा करू असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रपरिषदेत रविवार (13 नोव्हेंबर)ला चंद्रपूर येथे केले. Chitra wagh press conference
यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, राज्य का.सदस्य रेणुका दुधे,भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार,संजय गजपुरे,महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष अलका आत्राम,भाजप नेते वंदना आगरकाटे,लक्ष्मी सागर व वैशाली जोशी यांची उपस्थिती होती.
चित्रा वाघ म्हणाल्या,शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर असते.ग्रामपंचयतच्या निर्णयावर दारूबंदी होतांना बघितले आहे. Chandrapur liquor ban again महिलांचा कल दारूबंदी लागू करण्याकडे आहे. असे या दौऱ्यात निदर्शनास येत आहे,असेही त्या म्हणाल्या.सावलीच्या एका महिला पदाधिकाऱ्यांने दिलेले निवेदन घेऊन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी करावा यासाठी वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती वाघ यांनी दिली, चर्चा केल्यावर मुनगंटीवार यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.