News34 chandrapur
चंद्रपूर - ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सट्टा लावणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, तर त्याचा साथीदार पळून गेला.
Cricket betting
Cricket betting
रोशन नौदास काळबांधे 31 वर्षीय बियाणी पेट्रोल पंप रा. तुकूम असे अटक आरोपीचे नाव आहे. तर दुसरा आरोपी 41 वर्षीय प्रदीप गंगमवार आहे. England vs pakistan final match
आज दुपारी इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती मिळताच एलसीबीचे पोलीस निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल काळे, पोलीस कर्मचारी संजय अतकुलवार, संतोष, गोपाळ, रवींद्र, नितीन, नरेश यांनी छत्रपतीनगर मध्ये छापा टाकला. बियाणी सोसायटी चंद्रपूरच्या आवारात छापा टाकून आरोपींना पकडले. आरोपींकडून रोख रक्कम व मोबाईलसह 20 हजारांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. Chandrapur lcb आरोपीने आपल्या एका साथीदाराचे नाव सांगितले असून आरोपीचा शोध सुरू आहे.
गंगमवार हा आरोपी मागील अनेक वर्षांपासून क्रिकेट सामन्यावर पैश्याचा जुगार खेळतो, गडचिरोली पोलिसांनी गंगमवार यांचेवर कारवाई सुद्धा केली होती. T20 cricket world cup 2022
विशेष म्हणजे गंगमवार याला जुगार खेळण्याची सवय असल्याने त्याच अपहरण सुद्धा झाले होते.