News34 chandrapur
गडचांदूर/चंद्रपूर - 30 ऑक्टोम्बरला पती-पत्नीचा वाद पोलीस ठाण्यात पोहचला, मात्र पोलिसांनी दमदाटी व समजूत न काढता पती ला अमानुषपणे मारहाण केली, प्रकृती बिघडल्याने पती ला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Sp chandrapur
कोरपना तालुक्यातील हिरापूर येथे राहणारे 28 वर्षीय अनिकेत भास्कर पावडे यांचे पत्नीसोबत वाद व्हायचे, भांडणाला कंटाळून पत्नीने गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
30 ऑक्टोम्बरला पोलिसांनी अनिकेत ला पोलीस स्टेशनमध्ये बोलाविले, त्यांनतर 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी बेल्ट ने अनिकेत ला अमानुषपणे मारहाण केली, वैद्यकीय उपचारासाठी अनिकेत ला गडचांदूर रुग्णालयात दाखल केले मात्र परंतु थातूर मातूर उपचार मारून रात्री 3 वाजता अनिकेत ला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. brutally beaten in police station
मात्र अनिकेत ला शारीरिक इजा झाल्याने आई-वडिलांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, त्यांनतर अनिकेत ची वैद्यकीय चाचणी करण्यात आली, अहवालात अनिकेत ला बेल्ट ने मारहाण करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत चंद्रपूर भाजप अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांना माहिती कळताच पदाधिकाऱ्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचले.
डॉ. गुलवाडे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत अनिकेत ला मारहाण करणाऱ्या पोलीस शिपाई तिवारी याला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी केली.
यावेळी जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझरे, अनु. जमाती जिल्हाध्यक्ष धनराज कोवे,जिल्हा सचिव आक्कापेल्लीवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सदर प्रकरणाची माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी गुलवाडे यांनी चर्चा केली.
सदर प्रकरणी गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्याशी संपर्क करीत माहिती जाणून घेतली असता अनिकेत पावडे हा दारूच्या नशेत पत्नीला नेहमी बेदम मारहाण करीत होता, त्याबाबत अनिकेत वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अनिकेत यांनी जो आरोप पोलिसांवर लावला आहे तो पूर्णतः खोटा आहे, प्रकरण अंगलट आल्यावर त्याने पोलिसांवर खोटा आरोप लावला असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक आमले यांनी दिली.
मात्र वैद्यकीय चाचणीत अनिकेत ला बेल्ट ने मारहाण करीत असल्याचे निष्पन्न झाले असून कौटुंबिक वादाचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण केंद्र आहे पण पोलिसांनी बळाचा वापर करीत त्याला बेल्ट ने अमानुषपणे मारहाण करणे कितपत योग्य आहे?
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची पाठराखण करतात की कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.